Thursday 26 November 2020

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच


🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.


🔰यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.

तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


🔰यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी  30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये.


🔰तर, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...