Thursday 26 November 2020

तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन


🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संकटात सापडलेल्या तृतीयपंथी व्यक्तींना निवारा देण्यासाठी गुजरातच्या वडोदरा शहरात ‘गरिमा गृह’ या नावाने एका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.


🔰29 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या “तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम-2020” यामध्ये समर्पित असे एक राष्ट्रीय संकेतस्थळ तयार करण्याची तरतुद आहे.


🔰ह व्यासपीठ एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला देशात कोणत्याही भागातून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात मदत करते. प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणत्याही कार्यालयाला भेट न देता त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.


🔴‘गरिमा गृह’ विषयी...


🔰‘गरिमा गृह’चे व्यवस्थापन संपूर्णपणे तृतीयपंथीयांकडून संचालित केल्या जाणाऱ्या ‘लक्ष्य ट्रस्ट’कडून केले जाणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींना निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा आणि करमणुकीच्या सुविधा या मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांना कौशल्य विकासाचे धडे देऊन त्यांना सक्षम करणे, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता येणार, या उद्देशाने ही संस्था आहे.


🔰‘गरिमा गृह’ प्रमाणेच आणखी 13 केंद्रांची स्थापना करण्यासाठी 10 शहरांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यात वडोदरा, नवी दिल्ली, पटना, भुवनेश्वर, जयपूर, कोलकाता, मणीपुर, चेन्नई, रायपूर, मुंबई या शहरांचा समावेश आहे. या योजनेत मंत्रालयाने निश्चित केलेल्या प्रत्येक केंद्रावर किमान 25 लोकांचे पुनर्वसन केले जाणार.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...