Wednesday 3 January 2024

जीवनसत्त्व ई


» याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे. 

» ई जीवनसत्त्व आल्फा, बीटा, गॅमा व डेल्टा टोकोफेरॉल म्हणून नैसर्गिक रीत्या वनस्पतिज तेलांमध्ये असते. 

» नेहमीच्या अन्न शिजविण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होत नाही; परंतु खरपूस तळण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होतो.

» ई जीवनसत्त्व सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांत आढळते. करडई, शेंगदाणा, मका व सरकी यांच्या तेलात, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्यांमध्ये ई जीवनसत्त्व असते. 

» सालीट (लेट्यूस) या पालेभाजीत व लसूणघास (आल्फा - आल्फा) या गवतात जास्त प्रमाणात तर गव्हाच्या अंकुरापासून काढलेल्या तेलात ई जीवनसत्त्व सर्वाधिक असते. 

» लोणी, अंड्यातील पिवळा बलक, यकृत यांतही ई जीवनसत्त्व आढळते. प्रौढ व्यक्तीला दररोज सु. १५ मिग्रॅ. ई जीवनसत्त्व लागते.

» ई जीवनसत्त्व निरनिराळ्या पेशींमध्ये प्रतिऑक्सिडीकारक आणि सहविकर म्हणून कार्य करते. 

» शरीरातील मेदाम्ले, अ तसेच क जीवनसत्त्वांचे ऑक्सिडीकरणापासून बचाव करते. 

» ई जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साइडे रक्तपेशीत साठविली जातात आणि पेशीपटलात विकृती निर्माण होऊन त्या पेशी लवकर नाश पावतात. 

» केशवाहिन्यांमधील रक्ताच्या पारगम्यतेवर विपरित परिणाम होऊन द्रवयुक्त सूज येते आणि पांडुरोग होतो. 

» ई जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे स्नायूंची वाढ खुंटते. 

» उंदरांवरील प्रयोगात मादीतील वंध्यत्व व नरात वृषण अपकर्ष यावर ई जीवनसत्त्व उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. 

» ते प्रजननासाठी आवश्यक असून वंध्यत्व, गर्भपात इ. विकृतींकरिता वापरतात. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता होत नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...