Wednesday 3 January 2024

चालू घडामोडी :- 03 जानेवारी 2024

◆ ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रातील पाहिले 5 जिल्हे :- 1] सोलापूर, 2] अहमदनगर, 3] बीड, 4] धाराशिव, 5] सांगली

◆ "प्रशासकीय योगायोग" पुस्तकाचे लेखक सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड आहेत.

◆ "सुप्रशासन संधी आणि आव्हाने" पुस्तकाचे लेखक महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर आहेत.

◆ 3 जानेवारी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, "महाराष्ट्र बालिका दिन" आणि "महिला शिक्षण दिन".

◆ अत्याचार, लैंगिक शोषण तसेच Acid हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे यासाठी राज्यात 2013 मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली.

◆ मनोधैर्य योजना विस्तारानुसार कायमचे अपंगत्व आल्यास अशा पीडित व्यक्तीस 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

◆ केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आलेल्या 'पीएम विश्वकर्मा' योजनेंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सप्टेंबर 2023 मध्ये विश्वकर्मा जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली होती.

◆ भारत संयुक्त अरब अमिरातीचा संयुक्त लष्करी मराव 'डेझर्ट सायक्लोन' राजस्थानमध्ये सुरू झाला आहे.

◆ 8 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान गोवा इंटरनॅशनल पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ सार्वजनिक सहभागाद्वारे सीएसआयआर - राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने 59 वा स्थापना दिवस साजरा केला.

◆ महिला सशक्तीकरणाचे धोरण अनुसरत केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने महिला सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन मिळण्यासाठी पतीच्या ऐवजी एक/अनेक अपत्यांचे नाव नामनिर्देशित करण्याची परवानगी दिली.

◆ अनाहतने स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉश सी शिपमध्ये अंडर-19 मुलींचे विजेतेपद पटकावले.

◆ भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी किरण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ब्रिक्स गटाची एकुण सदस्य संख्या 10 झाली असून ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्ष पद रशिया या देशाकडे आहे.

◆ केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे.

◆ दिप्ती शर्मा ही अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये 100 विकेट घेणारी चौथी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे.

◆ कमलताई परदेशी(पुणे) यांचे नुकतेच निधन झाले. त्या "मसाला क्वीन" नावाने प्रसिद्ध होत्या.

◆ FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 चे विजेतेपद मॅग्नस कार्लसन याने पटकावले.

◆ FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 उझबेकिस्तान या देशात आयोजीत करण्यात आली होती.

◆ फेलिक्स त्सेसिकेदी यांची कांगो या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...