Wednesday 3 January 2024

गतीचे प्रकार



🌻एकरेषीय एकसमान गती (Linear Uniform Motion)

ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्यास “एकसमान गती ” म्हणतात. म्हणजेच एकसमान गती मध्ये चाल समान राहते.

उदा. एक वस्तू जर १० मिनिटात ३ किमी अंतर कापते, तर ती पुढच्या १० मिनिटात पण ३ किमी अंतर पार पडते.


🌹एकरेषीय नैकसमान गती (Linear Non-uniform Motion)

ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर त्यास “अकसमान गती ” म्हणतात. म्हणजेच एकसमान गती मध्ये चाल समान (constant) राहते.

उदा. एक दुचाकी जर १० मिनिटात ३ किमी अंतर कापते, तर ती पुढच्या १० मिनिटात ती ३ पेक्षा कमी अथवा जास्त अंतर पार पडते.


🌹एकसमान वर्तुळाकार गती (Uniform circular Motion)

जर वस्तू वर्तुळाकार मार्गावर एकसमान गतीमध्ये असेल तर तिला एकसमान वर्तुळाकार गती म्हणतात.

या गतीत चाल समान राहते परंतु वेग बदलत जातो.

कारण एक परिक्रमणा पूर्ण झाल्यानंतर विस्थापन हे शून्य असते. म्हणजेच चाल जरी समान असली तरी वेग मात्र शून्य होतो.

चाल = अंतर/काळ = परीघ/काळ

ही वस्तू फिरताना नेहमीच केंद्राकडे आकर्षित होऊन फिरत असते, त्या आकर्षण बलास Centripetal Force असे म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...