Wednesday 3 January 2024

काय आहे नवा 'हिट अँड रन' कायदा ? - ज्याचा ट्रक आणि बस ड्रायव्हर्स करत आहेत विरोध



🧐 तुम्हाला माहिती असेल, हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस होता. 


📝 त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.


🧑‍💻 मात्र हा 'हिट अँड रन' कायदा काय आहे ? हे अनेकांना माहिती नाही, दरम्यान या कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 


🤷‍♀️ काय आहे 'हिट अँड रन' नवीन कायदा ?


🚚 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास त्याला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. 


🏢 मात्र आता केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. 


🚍 यासोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा - 


🗣️ आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🙏 'हिट अँड रन' कायद्याविषयी असलेली - ही माहिती आपण इतरांना देखील शेअर करा-


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...