Wednesday 6 January 2021

टॉयकॅथॉन–2021


🔰केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते 5 जानेवारी 2021 रोजी संयुक्तपणे “टॉयकॅथॉन-2021” या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. भारतीय मुलभूत प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळणी विषयीची संकल्पना हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.


🔰कार्यक्रमामधून शाळा आणि महाविद्यालयामधले विद्यार्थी आणि शिक्षक, रचना तज्ञ, खेळणी तज्ञ आणि स्टार्टअप उद्योग भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यांना विषय धरून खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करणार आहेत.


🔰यासंबंधीचे प्रस्ताव 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन सादर करता येणार आहेत.


🔰हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), महिला व बालविकास मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, MSME मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालयाच्या अभिनवता कक्षाने आयोजित केलेला एक आंतर-मंत्रालय उपक्रम आहे.


💢पार्श्वभूमी


🔰भारतातले खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु 80 टक्के खेळणी आयात केली जातात. भारताला जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉन आयोजित केले जात आहे. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा वापर करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


🔰या कार्यक्रमामुळे शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने देशातल्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधले विद्यार्थी, प्राध्यापकांना आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...