Tuesday 23 February 2021

जागतिक खवल्या मांजर दिन: 20 फेब्रुवारी 2021



🎗दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसरा शनिवार जगभरात “जागतिक खवल्या मांजर दिन” म्हणून साजरा करतात. यंदा, 20 फेब्रुवारी 2021 रोजी 10 वा जागतिक खवल्यामांजर दिन साजरा केला गेला.


🎗खवल्या मांजर या दुर्मिळ प्राण्याविषयी जागृती वाढविणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना गती देणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.


🌺खवल्या मांजर विषयी....


🎗खवल्या मांजर (Pangolin) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे.


🎗हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्ण कटिबंधीय भागांमध्ये आढळतो.


🎗जयाची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे.

खवल्या मांजर निशाचर आहेत आणि त्यांच्या आहारात प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी असतात.


🎗खवल्या मांजर हा जगातील सर्वात जास्त अवैधरीत्या तस्करी होणारा सस्तन प्राणी आहे.खवल्या मांजराच्या आठ प्रजातींपैकी दोन (मनीस क्रॅसिकाडाटा आणि मनीस पेंटाटाक्टिला) भारतात आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...