Tuesday 23 February 2021

इंडिया टॉय फेयर 2021’: भारतातला पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा.



🔰भारतात प्रथमच, ‘इंडिया टॉय फेयर’ नामक पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा दि. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.


🔰राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी यांच्या स्वनिर्मित खेळणीना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा यामध्ये ही सहभागी होता येणार आहे.


🔰कार्यक्रमात विविध विषयांवर आधारित 1000 पेक्षा जास्त स्टॉल पाहायला मिळणार. तसेच ज्ञानवर्धक चर्चासत्रे आणि वेबिनार देखील आयोजित केले जातील.


🔰कार्यक्रमात NCERT, SCERT, CBSE यासारख्या शैक्षणिक संस्था, IIT गांधीनगर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि अहमदाबाद येथील चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी यांच्या मदतीने मुलांना कल्पक खेळणे तयार करण्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतातले खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु 80 टक्के खेळणी आयात केली जातात. भारताला जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा वापर करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...