Sunday 8 August 2021

उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..



🔰भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली.

भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत.

योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे.


🔴उडान (उडे देश का आम नागरिक) योजना..


🔰भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.


🔰या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...