Sunday 8 August 2021

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..🔰5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.


🔴आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..


🔰2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.


🔰गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


🔰आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...