Sunday 8 August 2021

झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल



🌼महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.


🌼या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.


🌼काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.


💢झिका विषाणूविषयी


🌼डग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे वाहक असलेल्या एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग पसरतो.


🌼झिका विषाणू संसर्गाची काही सामान्य लक्षणे - ताप, शरीर दुखणे, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात आणि संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत.


🌼तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अश्या बाळांचे डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकते. यास्थितीला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसेच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

आतापर्यंत या विषाणूवर ना कोणती लस उपलब्ध नाही, ना कोणते ठराविक औषध उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...