Sunday 8 August 2021

सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात बांधण्यात आला.🔰सीमा रस्ते संघटनेने (BRO) भारतीय हद्दीत जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे.


🔰पर्व लड्डाखमध्ये “उमलिंग ला पास” या ठिकाणी 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. 52 किलोमीटर लांबीचा हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो.


🔰याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हिया देशामध्ये होता. तो रस्ता समुद्रसपाटीपासून 18,953 फूट एवढ्या उंचीवर आहे.


🔴सीमा रस्ते संघटना (BRO) विषयी..


🔰भारत सरकारची सीमा रस्ते संघटना (BRO) ही भारतीय सीमेलगतच्या भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम करते. ही संस्था भारतीय लष्कराच्या भूदलाचा एक भाग असलेली संघटना आहे. तसेच लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी ही संस्था रस्ते बनविते.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...