Monday 11 April 2022

म्हणी व अर्थ

मराठी व्याकरण व लेखन:
🌷म्हणी व अर्थ🌷
🌷कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?------
ज्याला रक्षण करायला ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करुन चोरी केल्यावर कोणालाच सांगता येत नाही

🌷कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच------
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो

🌷कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची तट्टानी------
अतिशय थोर माणूस व अति क्षुद्र माणूस यांची बरोबरी होत नाही

🌷कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं------
लाजलज्जा पार सोडून देणे

🌷कठीण समय येता कोण कामास येतो?------
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही

🌷कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच------
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही

🌷कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी------
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते

🌷कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी------
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही

🌷कर नाही त्याला डर कशाला?------
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही

🌷करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?------
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

🌷करणी कसायची, बोलणी मानभावची------
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर

🌷करायला गेले गणपती अन् झाला मारुती------
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे, नाहीतर त्यातून भलतेच घडते

________________________

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷काप गेले नि भोके राहिली------
वैभव गेले नि त्याच्या खुणा राहिल्या / श्रीमंतीचे दिवस गेले, फक्त आठवणी राहिल्या

🌷काम नाही कवडीचं अन् रिकामपण नाही घडीचं------
काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो

🌷कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी------
काम साधण्यापुरते गोड बोलणे

🌷काळ आला होता पण वेळ आली नव्हती------
नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले

🌷काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची------
सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे

🌷कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही------
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

🌷कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते------
पूर्वग्रहदूषिच व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात

🌷काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली------
सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही

🌷शब्दसमूहाबद्दल एक शब्द🌷
   
🌷फार कमी बोलणारा - अबोल

🌷 आधी जन्म घेतलेला - अग्रज

🌷 देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा -   अनुष्ठान

🌷 सीमा नाही असे - असीम

🌷 घरी पाहुणा म्हणून आलेला - अतिथी

🌷 धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

🌷 ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम

🌷थोडक्यात समाधान मानणारा - अल्पसंतुष्ट

🌷 विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य - अतिक्रमण

🌷पायात काहीही न घालणारा - अनवाणी

🌷 कधीही नाश न पावणारे - अविनाशी

🌷 देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म - अवतार

🌷 जाणून घेण्यास अशक्य असे - अज्ञेय

🌷 वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख - अग्रलेख

🌷अनेक चांगल्या गुणांनी युक्त - अष्टपैलू

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...