Monday 11 April 2022

कवी व त्यांची टोपण नावे,मराठी व्याकरण

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
कवी व त्यांची टोपण नावे

1यशवंत दिनकर पेंढारकर
----- यशवंत
2मोरोपंत रामचंद्र पराडकर
----- मोरोपंत
3चिंतामण त्र्यंबक खानोलकर
-----आरती प्रभू
4गोपाल हरी देशमुख
----- लोकहितवादी
5शंकर काशिनाथ गर्गे
----- दिवाकर
6कृष्णाजी केशव दामले
----- केशवसुत
7सौदागर नागनाथ गोरे
----- छोटा गंधर्व
8रघुनाथ चंदावरकर
----- रघुनाथ पंडित
9हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
----- कुंजविहारी
10दासोपंत दिगंबर देशपांडे
----- दासोपंत
11सेतू माधवराव पगडी
----- कृष्णकुमार
12नारायण वामन टिळक
----- रेव्हरंड टिळक
13माणिक शंकर गोडघाटे
----- ग्रेस
14वसंत ना. मंगळवेढेकर
----- राजा मंगळवेढेकर
15कृष्ण शास्त्री चिपळूणकर
----- मराठीचे जॉन्सन
16केशवसुत----आधुनिक मराठी काव्याचे जनक
17बा.सी. मर्ढेकर
----- मराठी नवकाव्याचे जनक
18सावित्रीबाई फुले
----- आधुनिक मराठी कवितेच्या जननी
19संत सोयराबाई
------ पहिली दलित संत कवयित्री
20ना.धो.महानोर
----- रानकवी
21यशवंत दिनकर पेंढारकर
----- महाराष्ट्र कवी
22न. चि. केळकर
----- साहित्यसम्राट
23दादोबा पांडुरंग तर्खडकर
----- मराठी भाषेचे पाणिनी
24वि.वा. शिरवाडकर
----- कुसुमाग्रज
25राम गणेश गडकरी
----- गोविंदाग्रज/बाळकराम
26विष्णुशास्त्री चिपळूणकर
----- मराठी भाषेचे शिवाजी

मराठी व्याकरण

🌷 स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.

🌷 संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

🌷 नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.

🌷 अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.

🌷 शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.

🌷 सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.

🌷 शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.

🌷 साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

🌷प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.

🌷 धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.

🌷 टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.

🌷 मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.

🌷 महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...