Tuesday 19 April 2022

मराठीतील विशेष

🌸🌸 मराठीतील विशेष 🌸🌸

🌷 मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी - यमुना पर्यटन (१८५७) लेखक - बाबा पद्मनजी  या कादंबरीत विधवा स्त्रियांचे दु:ख चितारण्यात आले आहे.

🌷 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - हरी नारायण आपटे

🌷 मराठीतील पहिले नाटक - विष्णुदास भावे यांचे - सीता स्वयंवर (१८४३) ५ नोव्हेंबर - प्रादेशिक रंगभूमी दिन.

🌷 आधुनिक काव्याचे जनक - केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) २०१५ ला महाराष्ट्र शासनाने - पुस्तकांचे गाव ही योजना भिल्लार
(सातारा) येथून सुरू केली.

🌷 केशवसुतांनी इंग्रजीतील sonnet या काव्यप्रकारावरून सुनीत हा काव्यप्रकार मराठीत आणला.

🌷 मराठीतील पहिले सुनीत - मयूरासन आणि ताजमहाल. (सुनीत हा काव्यप्रकार १४ ओळीत आहे.)

🌷 मराठीतील पहिले प्रवासवर्णन - माझा प्रवास - विष्णू भट गोडसे (वसईकर).
T.me/guttemadammarathivyakaran
🌷 आधुनिक मराठीतील नवकाव्याचे जनक - बा. सी. मर्ढेकर

🌷 बा. सी. मर्ढेकरांना मराठीतील दुसरे केशवसुत ही उपाधी गंगाधर गाडगीळ यांनी दिली.

🌷 आधुनिक कथेचे जनक - गंगाधर गाडगीळ (एका मुंगीचे महाभारत हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक)

🌷 मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार - साळुबाई तांबवेकर (कादंबरी - चंद्रप्रभाविरह वर्णन)

🌷प्रणयपंढरीचे वारकरी  - माधव ज्युलियन

🌷 माधव ज्युलियन यांनी गझल (उर्दूतून) व रुबाई (फारशीतून) हा काव्यप्रकार मराठीत आणला.

🌷 काव्यात न मावणारा कवी - आरती प्रभू  (चिंतामण त्र्यंबक खानोलकर)

No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...