Tuesday 19 April 2022

वाक्प्रचार आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द

🌸🌸वाक्प्रचार 🌸🌸

🌷 अंगावरून वारे जाणे - शरीराचा उजवा किंवा दावा भाग लुळा पडणे

🌷 अग्निकाष्ठ भक्षण करणे -- स्वतःला जाळून घेऊन मरणे

🌷 अग्निदिव्य करणे -- फार मोठ्या संकटातून सुटका होणे

🌷 अग्निप्रवेश करणे -- स्वतः चितेवर चढून जाळून घेऊन मरणे

🌷 अचंबा वाटणे--आश्चर्य वाटणे

🌷अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

🌷 अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

🌷अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

🌷अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने)  मोठा आरडाओरडा करणे.

🌷 अक्कल पुढे धावणे -बुद्धिचा भलताच उपयोग करणे.

_________________________________
🌸🌸 शब्दसमूहाबद्दल एक शब्द 🌸🌸

🌷 धड ना इकडे धड ना तिकडे - त्रिशंकू

🌷 तीन महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक

🌷 सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे -  षण्मासिक

🌷भाषण ऐकण्यास जमलेले लोक - श्रोते

🌷 कष्ट करून उपजीविका करणारा - श्रमजीवी

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...