Tuesday 19 April 2022

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; मार्चमध्ये घाऊक महागाई दर १४.५५ टक्क्यांवर

🔥पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस सुरू असलेल्या वाढीमुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के इतका वाढला असून, हा महागाईचा उच्चांकी स्तर असल्याचं सांगितलं जात आहे. या अगोदर फेब्रुवारीत हा दर १३.११ टक्के इतका होता. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस, भाजीपाला, दूध आदींसह खाद्यान्न व दररोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली असल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात महागाईचा दर प्रचंड वाढल्याचे दिसत आहे.

🔥मार्च २०२१ मध्ये महागाई दर ७.८९ टक्के होता. जो की आता दुप्पट झाल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने मार्च २०२२ या महिन्याची महागाईची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर १४.५५ टक्के इतका असून, किरकोळ महागाई दर ६.९५ टक्के झाला आहे जो की मागील १७ महिन्यातील सर्वाधिक आहे.

🔥मार्चमध्ये खाद्यपदार्थांचा घाऊक महागाई दर ८.४७ टक्क्यांवरून ८.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्राथमिक वस्तूंच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमधील १३.३९ टक्क्यांवरून १५.५४ टक्के झाला आहे. याचबरोबर इंधन आणि उर्जेच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमधील ३१.५० टक्क्यांवरून ३४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

🔥उद्योग विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मधील महागाईचा उच्च दर मुख्यत्वे कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, बेस मेटल्सच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, याचा देखील परिणाम आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...