Wednesday 20 April 2022

सम संख्यांचे गुणधर्म पूर्ण संख्या पूर्णांक संख्या त्रिकोणी संख्या नैसर्गिक संख्या दोन संख्यांची बेरीज

📖 MPSC Maths Marathi🌷:
⭕️ सम संख्यांचे गुणधर्म ⭕️

💢 सर्व सम संख्यांना 2 ने नि:शेष भाग जातो.

💢 क्रमागत सम संख्यात 2 था फरक असतो.

💢 कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट सम संख्या असते.

💢 दोन किंवा जास्त सम संख्याची बेरीज, गुणाकर, वजाबाकी, ही सम संख्याच असते.

💢 कोणत्याही सम संख्येत एक मिळवल्यास किवा वजा केल्यास विषम संख्या मिळते.

⭕️  पूर्णांक संख्या ( I)  ⭕️

➡️ धन संख्या, ॠण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.

उदा:

-3,-2,-1

0

1,2,3

➡️" 0 "हा मध्यवर्ती बिंदू आहे.

1) सर्वात मोठी ॠणपूर्णांक संख्या = -1
2) सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही.

⭕️  पूर्ण संख्या ( W)   ⭕️

➡️ 0,1,2,3,--------------या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
➡️ सर्वात लहान पूर्ण संख्या - 0
➡️ सर्वात मोठा पूर्ण संख्या सांगता येत नाही.

⭕️ नैसर्गिक संख्या ( N) ⭕️

➡️ 1,2,3,4,------------या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
➡️ ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोजसंख्या म्हणतात.
➡️ नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते.
➡️ नैसर्गिक संख्यांचा गुणाकर नैसर्गिक संख्या येतो.
➡️ सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1

🔹🔹🔹त्रिकोणी संख्या 🔹🔹🔹

📚दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.

👉 उदा : 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91, इत्यादी

📌त्रिकोणी संख्या = n x(n+1)/2 या सूत्रात n = नैसर्गिक संख्या (1,2,3,4____)

🔹🔹🔹दोन संख्यांची बेरीज 🔹🔹🔹

📚दोन अंकी दोन संख्यांची बेरीज 19 पेक्षा मोठी व 199 पेक्षा लहान असते. कारण 10 + 10 = 20 आणि 99+99 = 198

👉तीन अंकी दोन संख्यांची बेरीज 199 पेक्षा मोठी आणि 1999 पेक्षा लहान असते.

🌸चार अंकी दोन संख्यांची बेरीज 1999 पेक्षा मोठी आणि 19999 पेक्षा लहान असते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...