Tuesday 19 April 2022

१९ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

१९ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

इ.स. १४५१ सली मुघल सुलतान बहलोल लोदी यांनी दिल्लीवर आपला राज्यभिषेक केला. दिल्लीच्या शासक पदी जाणारे ते पहिले अफगाण सुलतान होते
सन १७७० साली ब्रिटीश खोजकर्ता, नाविक, मानचित्रकार आणि रॉयल नेवीचे कप्तान जेम्स कुक ऑस्ट्रेलिया देशांत जाणारे पहिले व्यक्ती बनले.
इ.स. १७७५ साली कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई नंतर अमेरिकन क्रांतीला सुरुवात झाली.
सन १८८२ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील पश्चिम बंगाल प्रांताच्या कलकत्ता शहरात पहिल्या प्रसूती दवाखान्याची स्थापना करण्यात आली.
इ.स. १९७५ साली एक्स-रे खगोलशास्त्र, वैमानिकी आणि सौर भौतिकी येथे प्रयोग करण्यासाठी  भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला पहिला भारतीय उपग्रह आर्यभट याचे प्रक्षेपण करण्यात आले.
सन २००६ साली अमेरिकन अंतराळ यात्री नील आर्मस्ट्रॉंग यांनी आणलेला चंद्राचा तुकडा त्यांना भेट देण्यात आला.

__________________________

१९ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –
इ.स. १७८० साली सतराव्या शतकातील अवध प्रांताचे चौथे नवाब वजीरअली खान यांचा जन्मदिन.
सन १८९२ साली भारतातील सुप्रसिद्ध बालशिक्षणतज्ञ व समाजसेविका ताराबाई मोडक यांचा जन्मदिन.
इ.स. १९२२ साली जर्मन लढाऊ वैमानिक एरिच हार्टमैन यांचा जन्मदिन.
सन १९४६ साली ‘आंध्र पुरस्कार’ सन्मानित भारतीय शास्त्रीय गायिका तसचं, उस्ताद आमिर खान यांच्या अधिपत्याखाली प्रशिक्षण घेतलेल्या भारतीय शास्त्रीय गायिका कंकना बॅनर्जी यांचा जन्मदिन.
इ.स. १९५० साली भारताचे एकोणिसावे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांचा जन्मदिन.
सन १९५७ साली विश्वविख्यात भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्मदिन.
इ.स. १९६८ साली भारतीय विनोदी हिंदी चित्रपट अभिनेते अरशद वारसी यांचा जन्मदिन.
सन १९७७ साली अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय लांब उडी अ‍ॅथलेटिक्स खेळाडू अंजू बॉबी जार्ज यांचा जन्मदिन.
इ.स. १९८७ साली रशियन माजी व्यावसायिक टेनिसपटू मारिया शारपोव्हा यांचा जन्मदिन.

__________________________

१९ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
इ.स. १०५४ साली मुल जर्मन वंशीय कॅथोलिक चर्चचे पोप एगिसिम-डॅगसबर्गचा ब्रूनो यांचे निधन.
सन १८८२ साली इंग्रजी निसर्गविज्ञानी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ तसचं, उत्क्रांती विज्ञानाचे जनक चार्ल्स डार्विन यांचे निधन.
इ.स. १९०६ साली रेडियम व पोलोनियम धातूचे शोधकर्ता व नोबल पुरस्कार सन्मानित फ्रेंच देशातील संशोधक पियरे क्युरी यांचे निधन.
सन १९१० साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील महाराष्ट्र प्रांताच्या नाशिक जिल्ह्याचे ब्रिटीश जिल्हाधिकारी जॅक्सन यांची गोळ्या मारून हत्या करणारे थोर क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना फाशी देण्यात आली.
इ.स. १९१० साली क्रांतिकारक कृष्णाजी गोपाल कर्वे यांना नशिक येथील ब्रिटीश जिल्हाधिकारी जॅक्सन यांना क्रांतिकारक अनंत कान्हेरे आणि विनायक नारायण देशपांडे यांच्या सोबत मिळून गोळ्या झाडल्या प्रकरणी त्यांना फाशी दिण्यात आली.
सन १९७४ साली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आयुब खान याचं निधन.
इ.स. २००७ साली दूरदर्शन कार्टूनिस्ट मालिका द विजार्ड आफ़ आईडी चे व्यंगचित्रकार ब्रैंड पार्कर याचं निधन.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here