Friday 29 April 2022

महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:


महाराष्ट्राचे नाव, स्थान व विस्तार

महाराष्ट्र या शब्दाचा उगम : प्राचीन काळी महाराष्ट्राचा समावेश दक्षिणापथ किंवा दंडकारण्याच्या प्रदेशात होत असे. ढोबळमानाने दक्षिणापथ दंडकारण्य व  महाराष्ट्र हे एकच भौगोलीक प्रदेश मानले जात.

सर्वसाधारणपणे महाराष्ट्र हा शब्द चौथ्या दशकापासून वापरात आलेला आढळतो.
इ.स. ३६५ : मध्य प्रदेशातील  ‘ऐरण’ गावातील स्तंभालेखात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळतो.
इ.स. ५0५: बृहत्‌संहितेच्या ( वराहमिहीर) १0 व्या अध्यायात    महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख.
७ वे शतक : जैन मुनी संघदास गणीने बृहतकल्प भाष्यात महाराष्ट्राच्या कोल्लक परंपरेचा उल्लेख केला आहे.
८ वे शतक : मरहट्ट लोकांचे वर्णन ‘कुवलयमाला’ या काव्यग्रंथात केलेले आढळते. सम्राट अशोकचा नातू संप्रती याने देखील महारठ्ठ(महाराष्ट्र) असा उल्लेख केला आहे.
महानुभव वाङमय  : प्राचीन काळी दक्षिणेकडे आलेल्या लोकांनी  गोंड, मल्ल, पांडू, अपरान्त, विदर्भ व अश्मक अशी सहा राष्ट्रे वसवली. ही सहा राष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तयार झाले असावे. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र असा महानुभाव वाङमयात उल्लेख आढळतो.

महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्‍चिम व मध्य भागात वसलेले आहे.

अक्षवृत व रेखावृत्तीय विस्तार :

अक्षवृत्तीय विस्तार – 15° 08′ 46″ उत्तर ते 22°2’13” उत्तर.

रेखावृत्तीय विस्तार – 72°16′ 45″ पूर्व ते 80°9’17” पूर्व.

महाराष्ट्र विविध परीक्षा साहित्य.

महाराष्ट्राचा आकार – महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणासारखा आहे.  महाराष्ट्राचा आकार दक्षिणेकडे अरुंद आहे, तर उत्तरेकडे विस्तृत स्वरुपाचा आहे.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36%एवढे क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे.

लांबी व रुंदी – महाराष्ट्राची पूर्व-पश्‍चिम लांबी 800 कि.मी. व उत्तर-दक्षिण रुंदी 700 कि. मी. आहे.

___________________________

महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या
महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या (Maharashtra General Information Short Notes)
१) महाराष्ट्र राज्याची स्थापना: १ मे १६३०

२) महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:

अक्षांश: १५.८° उत्तर ते २२.१° उत्तर
रेखांश: ७२.६° पूर्व ते ८०.९° पूर्व

शेजारील राज्य :

पूर्वेस- छत्तीसगड , आग्नेयेस – आंध्रप्रदेश, दक्षिणेस- कर्नाटक आणि गोवा, उत्तरेस- मध्यप्रदेश, पश्चिमेस- अरबी समुद्र, वायव्येस- दादरा, नगर हवेली व गुजरात.

३) दक्षिणोत्तर अंतर    : सुमारे ७०० कि.मी.

४) पूर्व-पश्चिम अंतर    : सुमारे ८०० कि.मी.

५) समुद्र किनारा      : ७२० कि.मी.

६) राजधानी        : मुंबई

७) उपराजधानी         : नागपूर

८) प्रशासकीय विभाग     : सहा

९) प्रादेशिक विभाग     : चार

१०) एकूण जिल्हे         : ३६

११) जिल्हा परिषदा     : ३४ (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषद नाहीत)

१२) तालुके         : ३५५

(खालील माहिती २०११ च्या जणगणनेनुसार आहे)

१३) महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या     : ११,२३,७२,९७२

१४) महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या     : ५,८३,६१,३९७

१५) महाराष्ट्रातील स्त्री लोकसंख्या     : ५,४०,११,५७५

१६) महाराष्ट्रातील पुरुष-स्त्री प्रमाण : १०००:९१५

१७) लोकसंख्येची घनता         : ३६५ व्यक्ती प्रती चौरस किलोमीटर

१८) लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात क्रमांक:    दुसरा

१९) महाराष्ट्रातील एकूण साक्षरता     : ८२.९१%

२०) पुरुष साक्षरता         : ८९.८२%

२१) स्त्री साक्षरता         : ७५.४८%

२२) ग्रामीण साक्षरता         : ७७.०९%

२३) नागरी साक्षरता         : ८९.८४%

२४) ग्रामीण लोकसंख्या         : ५४.७७%

२५) नागरी लोकसंख्या         : ४५.२३%

२६) महाराष्ट्राचा राज्यपक्षी     : हरियाल (कबुतराच्या जातीचा एक पक्षी)

२७) महाराष्ट्राचा राज्यप्राणी    : शेकरू (मोठी खार)

२८) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष     : आंबा

२९) महाराष्ट्राची राजभाषा         : मराठी

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...