तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.
1 मराठी भाषा प्रश्नांची संख्या 25 गुण 50
2 इंग्रजी भाषा प्रश्नांची संख्या 25 गुण 50
3 सामान्य ज्ञान प्रश्नांची संख्या 25 गुण 50
4 बौद्धिक चाचणी प्रश्नांची संख्या 25 गुण 50
एकूण प्रश्नांची संख्या 100 गुण 200
परीक्षेचा दर्जा
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान.
बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान
महाराष्ट्र तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Talathi Syllabus 2022: Previous Year Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
No comments:
Post a Comment