18 November 2025

आधुनिक भौतिकशास्त्र

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️ किरणोत्सर्गी प्रारंभिक किरणोत्सर्गी पदार्थाच्या अणुअंकातून बाहेर पडतात.


🔹️ किरणोत्सर्गी पदार्थातून तीन प्रकारची प्रारणे बाहेर पडतात — अल्फा (α), बीटा (β) व गॅमा (γ).


🔹️ गॅमा किरण अतिसूक्ष्म तरंगलांबी असणारे चुंबकीय तरंग होय.


🔹️ ज्या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये ८२ पेक्षा जास्त प्रोटॉन असतात त्यांना जड मूलद्रव्ये म्हणतात.


🔹️ जड मूलद्रव्यातून अतिशय भेदक व अदृश्य किरण बाहेर फेकले जातात; या गुणधर्मास किरणोत्सर्ग म्हणतात.


🔹️ असा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सर्गी पदार्थ म्हणतात.

 ✅️→ उदा. युरेनियम, थोरियम, रेडिअम इ.


🔹️ हेन्री बेकरेल यांनी किरणोत्सर्गाची क्रिया प्रथम शोधली.


🔹️ मादाम क्युरी आणि पियरी क्युरी यांनी पोलोनिअम व रेडिअम या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा शोध लावला.


🔹️ कॅथोड किरणांस अदृश्यता निर्माण केली असता क्ष-किरण (X-ray) निर्माण होतात.


🔹️ क्ष-किरणांचा शोध प्रा. रॉन्टजेन यांनी लावला; म्हणून त्यांना रॉन्टजेन किरण असेही म्हणतात.


🔹️ क्ष-किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी (10⁻⁹ m) असणारे विद्युत् चुंबकीय तरंग होय.


🔹️ क्ष-किरणांची भेदकशक्ती प्रचंड असते; हे किरण कागद, लाकूड, धातूचे पातळ पत्रे यातून आरपार जाऊ शकतात.

🔹️ क्ष-किरणांचा उपयोग वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रात होतो.


🔹️ क्ष-किरणामुळे सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातूंची तपासणी करणे सोपे होते.


🔹️ क्ष-किरणांच्या साहाय्याने स्फटिकांमधील अशुद्धतेचा अभ्यास करता येतो.


🔹️ जेव्हा किरणोत्सर्गी मूलद्रव्याच्या अणूमधून अल्फा किंवा बीटा कण बाहेर फेकला जातो, तेव्हा त्या अणूचा बदल होऊन दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर होते — यास किरणोत्सर्गी विघटन किंवा किरणोत्सर्गी रूपांतरण म्हणतात.


🔹️ मूळ मूलद्रव्य → जनक मूलद्रव्य, नवनिर्मित मूलद्रव्य → अपत्य मूलद्रव्य.


🔹️ अल्फा कण धनप्रभारीत, बीटा कण ऋणप्रभारीत व गॅमा किरण प्रभारविरहित आहेत.


🔹️ अल्फा कण हे हेलिअमचे अणुकेंद्रक (⁴₂He) आहे.


🔹️ बीटा कण हे इलेक्ट्रॉन आहेत.


🔹️ किरणोत्सर्गी रूपांतरणाचे नियम :

 ✅️→ अल्फा कण निसरल्यास — अणुअंक -२ ने व अणुवस्तुमान -४ ने कमी होते.

 ✅️→ बीटा कण निसरल्यास — अणुवस्तुमानात फरक नाही, परंतु अणुअंक १ ने वाढतो.

 ✅️→ गॅमा किरण निसरल्यास — अणुवस्तुमान वा अणुअंक दोन्ही बदलत नाहीत.

No comments:

Post a Comment