Saturday 1 October 2022

उल्हास नदी

उल्हास नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती १२२ किलोमीटरचे अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. खोपोली, उल्हासनगर, ठाणे अशा महानगरांतून प्रदूषित होत पुढे अरबी समुद्राला मिळणाऱ्या या नदीच्या मुखात साल्सेट बेटावर मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे व भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर वसलेले आहे.

उल्हास नदीचा उगम लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगार्ली धरणात होतो. धरणापासून ३ कि.मी. अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील १४व्या क्रमांकाचा प्रसिद्ध कुणे धबधबा आहे. पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंडिवडे, कर्जत, नेरळ,कोदिवले, दहीवली,बिरदोले,शेळु ही प्रमुख गावे व शहरांतून वहात जाऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. ठाणे जिल्हयात वांगणी, बदलापूर, वसत, शहाड, मोहोने, कल्याण ही प्रमुख शहरे व गावे घेत पुढे शहाड येथे वालधुनी नदीला घेऊन दोन तीन किलोमीटर अंतरावर अटाळी येथे काळू नदीला मिळते व पूढे अरबी समुद्रास मिळते. उल्हास नदीला दिवा गावापासून पुढे वसईची खाडी असे म्हणतात.

कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशीर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरांत पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य Drainage System आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...