Saturday 1 October 2022

विषाणू

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स (prions) व व्हायरॉइड्स (viroids) असे वर्गीकरण करतात.

विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणुशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणुशास्त्रज्ञ म्हणतात. विषाणू हे पेशीमधील परजीवींप्रमाणे आहेत कारण की ते त्यांच्याप्रमाणे पेशीबाहेर प्रजनन करू शकत नाहीत. परंतु ते पेशीमधील परजीवींप्रमाणे पूर्णपणे सजीवही नाहीत. ते प्राणी, वनस्पती तसेच जीवाणू (bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना संसर्ग करू शकतात. जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात त्यांना बॅक्टेरियोफेग (bacteriophage) असे म्हणतात.

विषाणू (Virus) हे सजीव आहेत की नाहीत हे विवादास्पद आहे. बरेच विषाणुशास्त्रज्ञ त्यांना सजीव मानत नाहीत कारण की ते सजीवांच्या व्याख्येच्या सर्व कसोट्यांवर उतरत नाहीत. त्याशिवाय विषाणूंना पेशीभित्तिकाही नसते तसेच ते स्वतः चयापचय प्रक्रियाही करत नाहीत. जे त्यांना सजीव समजतात त्यांच्याकरीता ते थियोडोर श्वानने मांडलेल्या पेशी सिद्धांताला (Cell Theory) अपवाद आहेत, कारण विषाणू हे पेशींचे बनलेले नसतात.

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...