Saturday 1 October 2022

शास्त्रीय उपकरणे व वापर

.           

स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...