Ads

30 January 2021

राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना.



🔰समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी मासे पासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकाराच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत. सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते.


🔰सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सागरी किनाऱ्यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.


🔰भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

🔰अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे.


🔰कती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातल्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे.

भारतात ‘टिकटॉक’चा व्यवसाय बंद.


🔰चीनची बाईट डान्स ही कंपनी भारतातील टिकटॉक व हेलो उपयोजनांचा व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगण्यात आले. बाईट डान्स या समाज माध्यम कंपनीच्या मालकीचे टिकटॉक हे उपयोजन असून त्यावर भारताने बंदी घातली होती, तसेच सरकारने टिकटॉक व हेलो सह ५९ उपयोजनांवर जूनमध्ये बंदी घातली होती.


🔰टिकटॉकच्या जागतिक हंगामी प्रमुख व्हॅनेसा पप्पास व जागतिक व्यवसाय प्रमुख ब्लेक चँडली यांनी संयुक्त ईमेलमध्ये ही माहिती दिली असून टिकटॉक भारतात बंद करून कमर्चारीही कमी करण्यात येतील असे म्हटले आहे. भारतात पुनरागमन केव्हा होईल हे सांगता येणार नाही, पण आम्ही नक्कीच पुन्हा भरारी घेऊन भारतात परत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे.


🔰टिकटॉकच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कंपनीने भारतात २९ जून २०२० रोजी लागू करण्यात आलेले नियम पाळण्याचे वचन दिले होते तरी उपयोजनावर बंदी घालण्यात आली. स्थानिक कायदे व नियमांचे आम्ही पालन केले होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आम्हाला कुठलेही स्पष्ट निर्देश सरकारकडून मिळाले नव्हते.

51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)



🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) सांगता सोहळा  गोव्याच्या ताळीगाव येथे 24 जानेवारी 2021 रोजी पार पडला.


🎷51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 60 देशांचे 126 हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले, ज्यात 50 भारतीय प्रीमियर,  22 आशियाई प्रीमियर, 7 वर्ल्ड प्रीमिअर आणि 6 आंतरराष्ट्रीय प्रीमियर होते.


🎷माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.


🎗परस्कारांचे विजेते...


🎷डन्मार्कच्या ‘इन टू द डार्कनेस’  या चित्रपटाने प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे.


🎷तवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द साइलेंट फॉरेस्ट’ यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे.सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. प्रमाणपत्र आणि दहा लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


🎷सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ‘आय नेव्हर क्राय’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे.


🎷दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लक्ष रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ‘ब्रिज’ यासाठी प्रदान करण्यात आला आहे.


🎷सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण हा पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना पोर्तुगिज चित्रपट ‘व्हॅलेंटिना’ यासाठी देण्यात आला आहे.

भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा



🔰भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे त्याची रूपरेषा मांडली. दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत, असेही जयशंकर म्हणाले.


🔰पर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घडामोडींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले. चीनच्या भूमिकेतील बदल आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यामागील कारणे याबाबत चीनने भारताकडे अद्याप विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही, असे जयशंकर यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले. गेल्या ५ मेपासून दोन्ही देशांचे सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.


🔰सीमा व्यवस्थापनाबाबत जे सर्व करार झाले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखणे, सीमेवर शांतता राखणे हा सर्व प्रकारच्या संबंधांचा आधार असावा, आदी तत्त्वांचा जयशंकर यांनी मांडलेल्या आठ व्यापक तत्त्वांमध्ये समावेश आहे.


🔰तयाचप्रमाणे एकमेकांबद्दल आदर, संवेदना आणि हित या गोष्टींचे दोन्ही देशांनी पालन केले पाहिजे आणि याच तीन गोष्टी संबंध सुधारण्यास मदत करतील. उदयास येणाऱ्या शक्ती म्हणून प्रत्येकाच्या आकांक्षा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. चायना स्टडीजच्या १३ व्या अखिल भारतीय परिषदेत जयशंकर बोलत होते.

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी.



⚜️करोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.


⚜️गह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.


⚜️तयाचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.

महाराष्ट्र पोलिस भरती - Imp महत्त्वाचे प्रश्न



1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल


कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती

शैक्षणिक वर्ष २०२१-२१ या वर्षाकरीता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील २००४ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्यूटला पसंती दिली असून थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्यूट अव्वल स्थान प्राप्त केले असून थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशात कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची पसंती दिली आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय मुल्यांकन परिषद कडून नॅक "ए" ग्रेड  मिळाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधा, गुणवत्ता पुर्ण आणि दर्जेदार शिक्षण पद्धती, शिक्षणाचा दर्जा, उच्चविद्याभूषित प्राध्यापक वृंद, प्राध्यापकांचा अनुभव व संस्थेचा भविष्यातील दृष्टीकोन, संशोधन प्रक्रिया आणि विविध राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय नामांकीत कंपन्यात विद्यार्थ्यांची होणारी प्लेसमेंट इत्यादी गोष्टीमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट अग्रेसर असण्याची पावती म्हणजे हा "ए" ग्रेड हे सिद्ध झाले. याचा अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात १६५६ हून अधिक विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळाली असून यातील काही कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १० लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे.

समाजाला आणि देशाला उपयुक्त असणारे परफेक्ट इंजिनिअर देण्याचं काम सिंहगड संस्था गेली ३० वर्षे करीत आहे. . विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये दिले जाते. म्हणून थेट द्वितीय अभियांत्रिकी प्रवेशामधील कॅप राउंड टू साठी सिंहगडला २००४ विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दिली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील ४११८ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्युट प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाला प्रथम पंसती दिली होती. आता सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये मोजक्याच जागा शिल्लक असून ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक ठिकाणी थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येईल.

29 January 2021

मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा किंवा…”; भाजपा नेत्याची मागणी.


🟠कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलीय.


🟠लक्ष्मण सवादी यांनी, “ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीही केलीय. “जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो,” असं सवादी म्हणाले आहेत.


🟠कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  “सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात.


🟠कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर काही तासांमध्येच सवादी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलीय.

8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ लागू केला जाणार


▪️कद्रीय सरकार भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ (ग्रीन टॅक्स) लागू करण्याची मंजुरी दिली.


▪️वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देताना हा कर वसूल केला जाणार. या करामधून मिळणारा पैसा प्रदुषण नियंत्रणासाठी खर्च केला जाणार आहे.


🛑ठळक बाबी....


▪️8 वर्षे जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करताना रस्ता कराच्या 10 ते 25 टक्के इतका हरित कर लागू केला जाऊ शकतो.


▪️याव्यतिरिक्त सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या वाहनांच्या अ-नोंदणीकरण आणि भंगारात काढण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी हा नियम असणार आहे.


▪️15 वर्षांनंतर नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करताना खासगी वाहनांवर हरित कर लागू केला जाणार. मात्र सार्वजनिक वाहतूक विभागाच्या गाड्यांवर कमी हरित कर लागू केला जाणार.सरकारने जास्त प्रदूषण असेलल्या शहरांमधील वाहनांसाठी जास्त कर लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.


▪️सर्वाधिक प्रदूषित असलेल्या शहरांमध्ये नोंदणीकृत वाहनांवर सर्वाधिक करीत कर आकारला जाणार

आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार.



🔰फरान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं  माहिती दिली.


🔰फरान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.


🔰भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.

Online Test Series

28 January 2021

'यूपीएससी उमेदवारांना आणखी संधी नाही’


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कोविड १९ महासाथीच्या काळात झालेल्या परीक्षेत गेल्या वर्षी संधी हुकलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील उमेदवारांना आणखी संधी देण्याचा कुठलाही विचार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट केले.


न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील पीठास अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले की, अशी संधी देता येणार नाही. राजू यांनी कार्मिक व प्रशिक्षण विभागाची बाजू मांडली.  राजू यांनी सांगितले की, यूपीएससीच्या उमेदवारांना आणखी संधी देण्याचा सरकारचा विचार नाही, असे संकेत कालच केंद्राने दिले आहेत, त्याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत.


दरम्यान, यासंदर्भातील रचना सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २५ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येईल असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की,  केंद्र सरकारने याबाबत विहित काळात प्रतिज्ञापत्र दाखल करून नोटिसा जारी कराव्यात.

अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर


🔰एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कसोटी अजिंक्य स्पर्धा (World Test Championship) सुरू करण्यात आली. या स्पर्धेची रूपरेषा जाहीर करतानाच स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर १० ते १४ जून या दरम्यान खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होते. पण ICCने आता अंतिम सामना पुढे ढकलला असून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.


🔰ICCच्या महत्त्वाकांक्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवरच होणार आहे. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार हा सामना १० ते १४ जूनऐवजी आता १८ ते २२ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. IPL 2021 चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे BCCIच्या विनंतीला मान देत ICCने अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे.


🔰नव्या नियमांनुसार हल्ली एका देशातून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास क्वारंटाइनचा नियम लागू होतो. ७ ते १४ असा विविध ठिकाणी हा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच IPL स्पर्धेत पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांचे खेळाडू खेळतात. त्यामुळे कोणतेही दोन संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पोहोचले तरी त्या संघातील खेळाडूंना क्वारंटाइन आणि सरावाला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने अंतिम सामना पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ICCने अंतिम सामना पुढे ढकलला आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांची पक्षातून हकालपट्टी.


🔰नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.

 

🔰ओली यांच्या अलीकडच्या कृतींबाबत पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड व माधवकुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ‘दि हिमालयन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.


🔰परचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले. ओली हे पक्षाचे नियम मोडीत  असल्याचा आरोप आहे.

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय.


🔰लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अ‍ॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.


🔰या अ‍ॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता. आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.


🔰माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा गोळा करणं, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यांची उत्तर देण्यात कंपन्या असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

निम्म्यावर स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार.


🔰करोना काळात देशभरातून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या ४५ लाखांहून अधिक कामगार-मजुरांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उत्तर प्रदेशमधील लघु व मध्यम उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. इतरांनाही मनरेगासह स्वयंरोजगाराच्या अन्य योजनांमध्ये रोजगार पुरविण्यात येत असल्याने आता बहुतांश स्थलांतरित  अन्य राज्यांमध्ये परतणार नाहीत, असे उत्तर प्रदेशच्या लघु व मध्यम उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नवनीत सेहगल यांनी सांगितले.


🔰करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या तीन-चार महिन्यांच्या काळात दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातून लाखो स्थलांतरित मजूर व कामगार उत्तर प्रदेशमध्ये परतले. रस्ते व रेल्वे वाहतुकीची साधनेही उपलब्ध न झाल्याने हजारो कामगारांनी मिळेल त्या वाहनाने व पायीही प्रवास केला. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्ये रोजगार पुरविण्यासाठी स्वतंत्र स्थलांतरित आयोग (मायग्रंट कमिशन) स्थापन करण्याची घोषणा केली होती.


🔰सथलांतरित आयोगाकडे सुमारे ४५ लाख जणांची नोंद झाली आहे. या कामगार-मजुरांचे शिक्षण, रोजगार कोणत्या स्वरूपाचा होता, त्यांच्याकडे कोणते व्यवसाय कौशल्य आहे, हे पाहून आतापर्यंत २८ लाख २८ हजार ३७६ कामगार-मजुरांना येथील लघु-मध्यम स्वरूपाच्या सुमारे ११ लाख ५० हजार उद्योगांमध्ये रोजगार देण्यात आला आहे.


🔰समारे चार लाख जणांना शासकीय आस्थापनांशी निगडित रोजगार देण्यात आला आहे. मनरेगा, मुद्रा बँक योजनेसह स्वयंरोजगार यांच्या योजनांचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आता हे स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशमध्येच राहतील, असे अपेक्षित असल्याचे सेहगल यांनी सांगितले.

राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते


👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला 

👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला 

👤 हरुदय आर के : केरळ : कला 

👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला 

👤 तनुज समादार : आसाम : कला 

👤 वनिश केईशम : मणिपूर : कला 

👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला 

👤 जयोती कुमारी : बिहार : साहस 

👤 कवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस 

👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस 

👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 शरीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन

👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन

👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन

👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन

👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन

👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान

👤 आनंद : राजस्थान : विद्वान

👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान

👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान

👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान

👤 परसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम 

👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ 

👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ

👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ

👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ

👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ 

👤 खशी पटेल : गुजरात : खेळ

👤 मत्र हरखानी : गुजरात : खेळ .

भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस



जगातील सर्वात मोठ्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली. यामध्ये अमेरिका, युके, फ्रान्सलाही भारतानं मागे टाकलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात एकूण २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे.


 अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. 


आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी बनली मुख्यमंत्री; सरकारी योजनांचा घेतला आढावा.



✴️राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी, सृष्टीने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजानांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.


✴️दशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.


✴️हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद विकासखंडच्या दौलतपुर गावातील असलेली सृष्टी गोस्वामी २०१८ मध्ये बाल विधानसभेत बाल आमदार म्हणून देखील गेलेली आहे. तसेच, २०१९ मध्ये सृष्टीने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशीपसाठी थायलंडमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून सृष्टी ‘आरंभ’ ही योजना चालवत आहे. यामध्ये परिसरातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचं काम केलं जातं.


✴️सष्टी रुडकी येथील बीएसएम पीजी महाविद्यालयाची बीएससी अॅग्रीकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील प्रवीण पुरी हे गावात किराणा दुकान चालवतात. तर आई सुधा गोस्वामी या अंगणवाडी कार्यकर्ता आहेत. छोटा भाऊ श्रेष्ठ पुरू इयत्ता अकारावीचा विद्यार्थी आहे. सृष्टीचा सर्व गावाला अभिमान आहे, असं तिच्या वडिलांना म्हटलं आहे.

प्रमुख पुरस्कार आणि सम्मान 2019-20



एशिया गेम चेंजर अवार्ड 2020- शेफ विकास खन्ना


लोकमान्य टिळक नेशनल अवार्ड 2020- सोनम वांगचुक


पी.सी.महालनोबिस पुरस्कार 2020- सी.रंगराजन


डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार 2020- वी.प्रवीण.राव


गुलबेंकियन पुरस्कार 2020- ग्रेटा थेंबर्ग


एबल पुरस्कार 2020- हिलेल फुरस्तेनबर्ग


डैन डेविड पुरस्कार 2020- गीता सेन


टायलर पुरस्कार 2020- पवन सुखदेव


इंदिरा गांधी पुरस्कार 2020- आर. रामानुजम


क्रिस्टल अवार्ड 2020- दीपिका पादुकोण


संगीत कलानिधि पुरस्कार 2019- एस. सौम्या


एकलव्य पुरस्कार 2019- जिह्ला दलबेहेरा


प्रितज़कर अवार्ड 2019- अराटा इसोजोकी


विश्व खाद्य पुरस्कार 2019- साइन एन ग्रूट


डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अवार्ड 2019- के. शिवन


व्यास सम्मान 2019- नासिरा शर्मा(कागज़ के नाव)


सरस्वती सम्मान 2019- वासदेव मोही


मूर्ति देवी पुरस्कार 2019- विश्वनाथ तिवारी


ज्ञानपीठ पुरस्कार 2019- अच्युतन नंबूदरी 


रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार 2020- जावेद अख्तर


मैडल ऑफ द आर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया -शोभा शेखर


हीरो टू एनिमल्स(पेटा)- नवीन पटनायक


सेंट्रल बैंकर ऑफ द ईयर- शक्तिकांत दास


आर्डर ऑफ राइजिंग सन- थांगजाम धबली सिंह


संयुक्त राष्ट्र सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ द ईयर-मेजर सुमन गवानी


युगांडा का सर्वोच्च नागरिक सम्मान-राजेश चपलोत


वैश्विक मानवतावादी पुरस्कार-सचिन अवस्थी

पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा.



📋पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वारसास्पर्धे’ला तोंड फुटले. तृणमूलने नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त त्यांचा जन्मदिवस ‘देशनायक दिवस’ जाहीर केला, तर केंद्र सरकारने ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला.


📋तणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यात मोठी मिरवणूक काढून नेताजींची जयंती साजरी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पराक्रम दिना’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यभर अनेक कार्यक्रम आयोजित करून परस्परांशी जणू स्पर्धाच केली.


📋तणमूल आणि भाजप यांच्यातील निवडणूकपूर्व राजकीय संघर्ष आजपर्यंत रस्त्यावर होत होता. परंतु शनिवारी नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मारकात झालेल्या सरकारी कार्यक्रमातही निवडणुकीच्या राजकारणाने शिरकाव केल्याचा प्रत्यय आला.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते.


📋ममता भाषणासाठी उभ्या राहताच श्रोत्यांमधील भाजप समर्थकांनी जय श्रीराम घोष सुरू केला. त्यामुळे ममता यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारचा अपमान अस्वीकारार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय नाही. निमंत्रित केल्यानंतर मान राखला पाहिजे. निमंत्रित करून कोणीही अपमानित करीत नाही, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.

Online Test Series

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नियोजित वेळापत्रकानुसार अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपली आहे.



या कालावधीचे नियोजन कसे  करावे? असा प्रश्नांसाठी आपुलकीचा सल्ला :


1. शेवटच्या दीड महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision. तुमचे राहिलेले महत्वाचे टॉपिक या आठवड्यात संपवून घ्या. 

जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा. 


बर्‍याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे. 


2. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा. 


3. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा.. 


विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल.. 


4. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. 

(रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, 

किमान 7 तास झोप घ्या )

 ( दुपारची झोप (विशेषतः पुण्यातील उमेदवारांनी) बंद करून दुपारी csat प्रॅक्टिस करा. कारण आपला csat paper दुपारी असणार, आणि झोप येत असल्यास आकलन, आकडेमोड याला लागणारा वेळ वाढेल).. आणि जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.


5. एक-दीड महिना शिल्लक असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा.. 


6. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्‍याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते.. 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)



🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : जयंत नारळीकर .

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे



प्रश्न१५१) कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- पियुष गोयल


प्रश्न१५२)  कोणती बँक “टू बिग टू फेल” यादीत समाविष्ट करण्यात आली आहे?

उत्तर :- भारतीय स्टेट बँक,आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक


प्रश्न१५३) कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१५४) कोणत्या व्यक्तीची किर्गिजस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली?

उत्तर :- सादीर झापारोव्ह


प्रश्न१५५) कोणत्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांचा ‘माजी सैनिक दिन’ साजरा करतात?

उत्तर :-  14 जानेवारी


प्रश्न१५६) कोणत्या मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा केली?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न१५७) कोणती व्यक्ती डिजिटल कर्ज सेवांचे नियमन करण्यासाठी RBIने नेमलेल्या कार्य गटाचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- सौरव सिन्हा


प्रश्न१५८) कोणत्या संस्थेने ‘तेजस’ नामक हलके लढाऊ विमान तयार केले?

उत्तर :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


प्रश्न१५९) कोणत्या देशात “विलियूचिन्स्की धबधबा” आहे?

उत्तर :- रशिया


प्रश्न१६०) कोणत्या काळात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2021’ पाळला गेला?

उत्तर :- 18 जानेवारी - 17 फेब्रुवारी