Ads

16 December 2021

भारतीय नियोजन आयोगाची कार्य

१)भारतीय नियोजन आयोगदेशाच्या स्रोतांचे मूल्यांकन करणे .

२)या स्रोतांच्या प्रभावी वापरासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.

३) प्राधान्यक्रम ठरविणे आणि योजनांना संसाधनांचे वाटप करणे.

४)योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा निश्चित करणे.

५)वेळोवेळी योजनांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे.

६) देशातील संसाधने सर्वात प्रभावी आणि संतुलित पद्धतीने वापरण्याची योजना आखणे.

७) आर्थिक वाढ रोखणारे घटक ओळखणे.

८) योजनेच्या प्रत्येक टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा निश्चित करणे.

🌺2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते विघटन करण्याची घोषणा केली आणि जानेवारी  2015 मध्ये त्याच्या जागी एनआयटीआय आयोग स्थापन झाला .

दिनांक १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजे ८५ वर्षांपूर्वी 'भारतीय रिझर्व्ह बँक' स्थापन झाली होती.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था असून तिच्यामार्फत द्रव्यविषयक धोरण राबवले जाते. १९२६ साली हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अ‍ॅण्ड फायनान्स’ या नावाने एक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे नाव द्यावे, अशी शिफारस केली.

८ सप्टेंबर १९३३ रोजी राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेविषयीचे विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आले. ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली. त्यामुळे हे विधेयक ‘आरबीआय अ‍ॅक्ट १९३४’ या नावाने स्वीकृत झाले. अशा रीतीने १ एप्रिल १९३५ रोजी ‘आरबीआय’ची स्थापना झाली.

सुरुवातीला ‘आरबीआय’ची स्थापना खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली. तिचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती. तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला.

‘आरबीआय’ची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, ‘आरबीआय’च्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी आदी कारणांसाठी ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी १९४९ पासून ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी (सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण) ‘आरबीआय कायदा १९४८’ संमत करण्यात आला. ‘आरबीआय’च्या राष्ट्रीयीकरणाबाबतचे विधेयक तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मांडले.

* ‘आरबीआय’चे व्यवस्थापन *

गव्हर्नर हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. ‘आरबीआय’चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. (१ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७) तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते. त्यांच्या कालखंडातच भारत-पाकिस्तान फाळणी झाली. ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास असून ते ‘आरबीआय’चे २५ वे गव्हर्नर आहेत. त्यांच्याआधी २४वे गव्हर्नर उर्जित पटेल होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनान्शियल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸 RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸 RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸 भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🔸 RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸 सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸 वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे डेप्युटी गव्हर्नर आहेत.

* ‘आरबीआय’चे चलनविषयक धोरण *
(Monetary Policy of the RBI )
‘भारतीय रिझर्व्ह बँक’ ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे. भारतातील व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे किंवा पतपुरवठा करणे या आपल्या व्यवहारातून रिझव्‍‌र्ह बँक पतपेढीची निर्मिती करीत असते.

देशातील पसा आणि पतपसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे; कारण पैसा, पतपैसा यांचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या तुलनेत जास्त झाल्यास चलनवाढ आणि कमी झाल्यास चलनघट होण्याचा धोका असतो. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, १९३४ आणि भारतीय बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ या दोन्ही कायद्यांन्वये व्यापारी बँकांच्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्यांतील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझर्व्ह बँक करू शकते.

श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियान.


🅾सुरुवात - 16 सप्टेंबर 2015

🅾सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशात त्या प्रदेशाचा नावीन्यपूर्ण विकास घडविण्याची क्षमता असणार्‍या ग्रामीण विकास समुहाच्या विकास साधण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
 
🅾ग्रामीण भागाचा आर्थिक सामाजिक कायापालट घडविण्यासाठी सुमारे 5142.08 कोटी रूपयांचा आराखडा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियानाला (एसपीएमआरएम) मंजूरी देण्यात आली.
 
🅾संशोधन, विकास आणि क्षमता वृद्धीसाठी या अभियानात विशेष आर्थिक तरतुदही आहे.आर्थिक घडामोडी, कौशल्यविकास तसेच स्थानिक उद्योजकता तसेच पायाभूत सुविधा पुरवून हे समूह विकसित करण्यात येतील.
 
🅾समूहात सखल आणि किनारी प्रदेशात 25,000 ते 50,000 लोकसंख्या असलेल्या भौगोलिकदृष्टया लगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश असेल तर वाळवंटी, डोंगराळ प्रदेशात 5000 ते 15000 लोकवस्तीच्या प्रदेशांचा समूहात समावेश होईल. आदिवासी तसेच बिगर आदिवासी जिल्हयांसाठी समूह निवडीसाठी वेगवेगळे निकष राहतील.

🧩सर्वोच्च विकास साध्य करण्यासाठी समुहासाठी 14 घटक सुचविण्यात आले :-

🅾त्यात आर्थिक घडामोडीशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, कृषी सेवा, साठवणूक, गोदाम, डिजीटल साक्षरता, स्वच्छता, पाईपव्दारे पाणी पुरवठ्याची तरतूद, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, खेड्यातले रस्ते आणि सांडपाणी निचरा, पथदिवे, सर्व साधनयुक्त फिरते आरोग्य युनिट, शालेय तसेच उच्च शिक्षण सुविधांत सुधारणा, खेड्यांना रस्ते मार्गाने जोडणे, सिटीझन सर्व्हिस सेंटर, ई-ग्राम जोडण्या, सार्वजनिक वाहतूक, एलपीजी गॅस जोडण्या यांचा समावेश आहे.
 
🅾रुर्बन समुहासाठी राज्य एकात्मिक समूह कृती आराखडा तयार करतील त्यात या समूह विकासाची तपशीलवार योजना, त्यातून होणारे साध्य, विविध केंद्रीय विभाग, केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत योजनांतर्गत एकवटलेली साधनसंपत्ती, तसेच समुहासाठी आवश्यक क्रिटीकल गॅप फंडिगचा अंतर्भाव असेल.
 
🅾देशभरात येत्या 3 वर्षात असे 300 रुर्बन विकास समूह निर्माण करण्याचे अभियानाचे उद्दिष्ट आहे.रुर्बन समुहाच्या विकासासाठी प्रती समुहाच्या प्रकल्प खर्चाच्या 30% पर्यंत निधी, केंद्र सरकारचा वाटा म्हणून एसपीएमआरएमला अतिरिक्त निधी म्हणून पुरवला जाईल. 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

४ थी पंचवार्षिक योजना.


🅾कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

🅾प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

🅾महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973

🅾मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

अर्थव्यवस्था प्रश्नपत्रिका

1)  1997 च्या " आशियाई आर्थिक संकट
      " नंतर जागतिक पातळीवर स्थापन
       झालेला सर्वात  मोठा गट/समूह
       कोणता ?

1) WTO

2) IBSA

3) BRICS

4) G-20

2)  G-20  देशाच्या संघटनेचे मुख्यालय
      कोठे आहे ?

1) जिनिव्हा

2) न्यूयॉर्क

3) टोकियो

4) यापैकी नाही

3) अचूक विधान शोधा

अ) जगाच्या एकूण GDP च्या 90% भाग
      G-20  सदस्य देशाचा आहे

ब) जागतिक व्यापाराच्या 80 % वाटा
      G-20  देशाचा आहे

क) जगाच्या दोन तृतीअंश लोकसंख्या
       G-20  देशात राहतात

1)फक्त अ               2) फक्त अ आणि क
3)ब आणि क          4) वरील सर्व

4) " युरोपियन आर्थिक समुदाया " ची
      स्थापना केव्हा करण्यात आली आहे ?

1) 1957

2) 1968

3) 1991

4) 1997

5) आशियाई प्रशांत आर्थिक सहकार्य
     (APEC) विषयी अचूक विधान शोधा

अ) स्थापना 1989 मध्ये झाली

ब) APEC ची संकल्पना बॉब- हॉक यांनी
     मांडलेली होती

क) 1992 मध्ये सिंगापूर मध्ये सचिवालय
      स्थापन करण्यात आले

ड) भारत अजून ही यामध्ये सदस्य नाही

1)अ आणि ब.                 2)  अ,ब,क
3) ब,क,ड.                      4) वरील सर्व

6) North American Free Trade
     Area (NAFTA ) ही संकल्पना
     प्रथम कोणी मांडली होती ?

1) जॉर्ज बुश (जु.)

2) बिल क्लिंटन

3) रोनाल्ड रेगन

4) बराक ओबामा

7) सार्क (SAARC )संघटनेचे महत्वाची
     तत्वे कोणती आहेत ?

अ) सार्वभौम समता

ब) प्रादेशिक एकता

क) राजकीय स्वातंत्र्य

ड) परस्पर हितसंबंधात हस्तक्षेप नकरणे

1)फक्त ब                         2) ब,क,ड
3) अ,ब,क                       4) वरील सर्व

8) 7,8 डिसें 1985 रोजी 7 देशाच्या
     राष्ट्राध्यक्षानी मिळून कोणत्या
     ठिकाणी सार्क (SAARC) ची
     स्थापना करण्यात आली ?

1) दिल्ली

2) काठमांडू

3) ढाका

4) कोलंबो

9) सार्कचे निरीक्षक देश म्हणून कोणत्या
     देशाला ओळखले जाते ?

अ) अमेरिका

ब) ऑस्ट्रेलीया

क) जापान

ड) चीन

इ) द. कोरिया

1) अ,ब,क                      2)ब,क,ड,इ
3) अ,ब,क,ड                  4) वरील सर्व

10)  सार्कने (SAARC ) 2010-20 हा
       10 वर्षाचा काळ पुढीलपैकी
        कशासाठी घोषित केला होता ?

1) आतरक्षेत्रीय संपर्काता दशक

2) आंतरक्षेत्रीय अवकाश दशक

3) महिला सुरक्षा दशक

4) आंतरक्षेत्र आर्थिक सुरक्षा

आजचा पूर्ण पेपर हा आंतरराष्ट्रीय संघटना वर आधारित आहे...सर्वानी पेपर सोडवावा...

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

✅ अर्थव्यवस्था उत्तरे  ✅

1)- 4  ( 1999 मध्ये स्थापना)

2)- 4  ( कोठेही मुख्यालय नाही )

3)- 4

4)- 1

5)- 4

6)- 2

7)- 4

8)- 3

9)- 4

10)- 1

💐💐💐💐💐

आजचे प्रश्नसंच

'पायली एक्सप्रेस' म्हणून यास ओळखले जाते.
A- शायनी अब्राहम
B- पी. टी. उषा
C- ज्योतिर्मयी सिकदर
D- के.एम.बीनामोल
ANS--B

भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग____चे द्योतक आहे.
A- वीरता
B- त्याग
C- शांती
D- समृद्धी
ANS--B

चूनखडीचे रासायनिक नाव_____
A- कॅल्सियम कार्बोनेट
B- मॅग्नेशियम क्लोराइड
C- सोडीयम क्लोराइड
D- सोडियम सल्फाइड
ANS--A

संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष _
A- ऍनी बेसेन्ट
B- विजया लक्ष्मी पंडित
C- सरोजनी नायडू
D- इंदिरा गांधी
ANS--B

भारतामध्ये _राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.
A- महाराष्ट्र
B- मध्य प्रदेश
C- उत्तर प्रदेश
D- पश्चिम बंगाल
ANS--C

प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.
A- इंग्रजी
B- फ्रेंच
C- लॅटिन
D- डच
ANS--B

पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.
A- शुक्र
B- मंगळ
C- गुरु
D- बुध
ANS--A

एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी _अधिवेशन झाले पाहिजे.
A- एकवेळेस
B- दोन वेळेस
C- तीन वेळेस
D- चार वेळेस
ANS--B

विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.
A- कावेरी
B- कृष्णा
C- महानदी
D- ताप्ती
ANS--B

____ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.
A- गोल गुमट
B- हवा महल
C- चारमीनार
D- बुलंद दरवाजा
ANS--C

संदीप सिंह खेळाशी संबंधित आहे.
A- फुटबॉल
B- हॉकी
C- क्रिकेट
D- टेनिस
ANS--B

अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य
A- हिमाचल प्रदेश
B- सिक्कीम
C- महाराष्ट्र
D- केरळ
ANS--C

'जागतिक टपाल दिन' _रोजी साजरा केला जातो.
A- ११ नोव्हेंबर
B- ९ ऑक्टोबर
C- १० ऑक्टोबर
D- १० नोव्हेंबर
ANS--B

देशातील  केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली.
A- हैद्राबाद
B- दिल्ली
C- मुंबई
D- मद्रास
ANS--D

भारतातील पहिली 4G सेवा  राज्यात सुरु झाली.
A- महाराष्ट्र
B- पश्चिम बंगाल
C- दिल्ली
D- आंध्र प्रदेश
ANS--B

भारतामध्ये _राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन आहे.
A- उत्तर प्रदेश
B- महाराष्ट्र
C- बिहार
D- मध्य प्रदेश
ANS--A

हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांच्या रक्षण करण्यासाठी म्हणून या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला.
A- एम.एस.स्वामिनाथन
B- अनिल काकोडकर
C- रघुनाथ माशेलकर
D- वसंत गोवारीकर
ANS--C

भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारा ठिकाण__
A- लेह
B- बीकानेर
C- जैसलमेर
D- चेरापूंजी
ANS--A

"शाह अब्दुल अजीज" पदकचा संबंध_____देशाशी आहे.
A- मलेशिया
B- बांग्लादेश
C- पाकिस्तान
D- सौदी अरब
ANS--D

_हा सर्वात प्राचीन वेद आहे.
A- ऋग्वेद
B- यजुर्वेद
C- सामवेद
D- अथर्ववेद
ANS--A

१६ एप्रिल २००२ रोजी भारताची पहिली 'जनशताब्दी एक्सप्रेस' मार्गावर चालली होती.
A- हावड़ा- पटना
B- मूंबई- मडगाव
C- निजामुद्दीन- कोटा
D- हावड़ा- भुवनेश्वर
ANS--B

प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा___
A- स्वेज
B- पनामा
C- किल
D- यापैकी नाही
ANS--B

15 December 2021

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 1/12/2019


१)  सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7    2) 26 व 9   
3) 27 व 8       4) 29 व 6

उत्तर :- 1

२)  17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार
  2) एस.के. पाटील 
  3) ब्रिजलाल बियाणी 
  4) काकासाहेब गाडगीळ

   उत्तर :- 1

३)  कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय।

उत्तर :- 2

४)  घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.
   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.
उत्तर :- 4

५)  आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना

     असेल –
 
I        II

        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv) 40
          v) 10

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii 
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3

६) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4

७) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.

   1) क, ड    2) ब, क, ड   
3) अ, ड       4) ब, ड

उत्तर :- 2

८) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.

उत्तर :- 4

९) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

   अ) जे.व्हि.पी. समिती      ब) दार आयोग   

   क) राज गोपालाचारी समिती    ड) सरकारिया आयोग

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त अ, ब, ड      3) फक्त अ, क, ड    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

१०) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

   1) 1 मे 1960    
   2) 1 नोव्हेंबर 1956
    3) 1 मे 1966   
    4) 1 जून 1975

उत्तर :- 2

११) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती   
   ब) 12 वी घटनादुरुस्ती   
   क) 14 वी घटनादुरुस्ती   
   ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क
   2) फक्त अ, क, ड  
  3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1

१२)  2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती  झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड   

      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ

   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड    

4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3

१३)  राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश

   2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश

   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश

    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2

१४) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.

   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4

१५) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे   

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे

4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले

उत्तर :- 2

१६) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

   1) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

   2) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

   3) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीव्दारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

   4) वरील एकही नाही.

उत्तर :- 4

१७) पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा ?

      1) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
      2) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ
      3) छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड                 4) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड

उत्तर  :- 4

१८) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

   1) महाराष्ट्र    2) आंध्रप्रदेश 
  3) गुजरात     4) राजस्थान

   उत्तर :- 2

१९) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ?

   1) मराठवाडा
   2) महाराष्ट्र  
   3) आंध्रप्रदेश 
  4) कर्नाटक

   उत्तर :- 3

२०) खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?

   1) मराठवाडा 
   2) कोकण   
   3) विदर्भ    
   4) पश्चिम महाराष्ट्र

   उत्तर :- 3