११ एप्रिल २०२२

समानार्थी शब्द,कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार २०१८

समानार्थी शब्द

▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
 
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
▪️पंगत - भोजन, रांग, ओळ
 
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
▪️पान - पर्ण, पत्र, दल
 
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
▪️प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
▪️पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
▪️प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
▪️पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
▪️पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
▪️प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
▪️पाय - चरण, पाऊल, पद
 
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
▪️प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
▪️प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
▪️फट - चीर, खाच, भेग
 
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
▪️फरक - अंतर, भेद
-----------------------------


कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार २०१८

  ज्येष्ठ कवी-विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा प्रतिष्ठेचा कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

  अकरा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

  १९६० पासून डॉ. मनोहर हे गंभीर कवितालेखन करीत आहेत. त्यांच्या उत्थानगुंफा, काव्यभिमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगांतर, युगमुद्रा, बाबासाहेब! हे दहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

  'तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता' हा त्यांचा अकरावा कवितासंग्रह लवकरच येत आहे.
   'उत्थानगुंफा'ला राज्य शासनाचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार लाभला. जीवनायन' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र फाऊन्डेशन, पद्मश्री विखे पाटील, इंदिरा संत काव्यपुरस्कार मिळाले.

  स्वप्नसंहिता या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत काव्यपुरस्कार मिळाला आहे. याशिवाय मारवाडी फाऊन्डेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दिवकरराव जवळकर, सुगावा, गवळी प्रतिष्ठान आदी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

_______________________________

समानार्थी शब्द

चढण - चढ, चढाव, चढाई
 
चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
चवड - ढीग, रास, चळत
 
चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
 
चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण, केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
चाल - चढाई, रीत, चालण्याची रीत
 
छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
छळ -  गांजवणूक, ठकवणे, जाच
 
छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
छडा - तपास, शोध, माग
 
जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
जबडा - तोंड, दाढ
 
जुलूम - जबरदस्ती, जबरी, अन्याय
 
जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
झुणका - बेसन, पिठले, अळण
 
झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

ध्वनिदर्शक शब्द, काही महत्त्वाच्या म्हणी

ध्वनिदर्शक शब्द :

1.वाघाची - डरकाळी   
2.कोल्हयांची-कोल्हेकुई     
3.गाईचे-हंबरणे
4.गाढवाचे-ओरडणे
5.घुबडाचा-घूत्कार
6.घोडयाचे-किंचाळणे
7.चिमणीची-चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे-घुमणे
9.कावळ्याची-कावकाव
10.सापाचे-फुसफुसने
11.हत्तीचे-चित्कारणे
12.हंसाचा-कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा-गुंजारव
14.माकडांचा-भुभु:कार
15.म्हशींचे-रेकणे
16.मोराचा-केकारव 
17.सिंहाची-गर्जना
18.पंखांचा-फडफडाट
19.पानांची-सळसळ
20.डासांची-भुणभुण
21.रक्ताची  -  भळभळ

  :

1.वाघाची - डरकाळी   
2.कोल्हयांची-कोल्हेकुई     
3.गाईचे-हंबरणे
4.गाढवाचे-ओरडणे
5.घुबडाचा-घूत्कार
6.घोडयाचे-किंचाळणे
7.चिमणीची-चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे-घुमणे
9.कावळ्याची-कावकाव
10.सापाचे-फुसफुसने
11.हत्तीचे-चित्कारणे
12.हंसाचा-कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा-गुंजारव
14.माकडांचा-भुभु:कार
15.म्हशींचे-रेकणे
16.मोराचा-केकारव 
17.सिंहाची-गर्जना
18.पंखांचा-फडफडाट
19.पानांची-सळसळ
20.डासांची-भुणभुण
21.रक्ताची  -  भळभळ

 ________________________________

काही महत्त्वाच्या म्हणी

1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.
2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.
3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.
4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.
5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.
7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही
8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.
9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.
10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.
11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.
12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.
13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.
14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.
15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.
16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.
17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.
18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.
20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

राम गणेश गडकरी


राम गणेश गडकरी... अवघ्या सारस्वतांचं श्रद्धास्थान असणारं हे नाव. आज इतक्या वर्षांनंतरही साहित्यविश्‍वात या नावाचा दबदबा कायम आहे. गडकरींचा जन्म १८८५ मध्ये आजोळी म्हणजेच गुजरातमधील नवसारी येथे झाला. लहानपणचा बराचसा काळ तिथेच घालवल्यामुळे त्यांच्यावर गुजराती भाषेचा मोठा प्रभाव होता. ते गुजराती शिकलेही होते. त्यामुळेच गुजराती ही जवळपास माझी मातृभाषा आहे, असं ते म्हणत असत. त्यांच्यावर लहानपणी पाहिलेल्या गुजराती नाटकांचा मोठा प्रभाव होता. एक व्रात्य मुलगा हादेखील त्यांचा लहानपणचा परिचय... तो कधीच सरळ चालणारा मुलगा नव्हता. या  स्वभाववैशिष्ट्याची फारशी कुठे नोंद नाही पण त्यांचा स्वभाव असाच होता. ते अतिशय हट्टी होते. पण असं खट्याळ, खोडकर मूल असूनही घरतल्यांनी त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्यांच्या उत्साह आणि ऊर्जेला योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला. ते वडिलांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या जडणघडणीत या स्नेहार्द नात्याचाही मोठा प्रभाव राहिला आहे.
एखाद्या मोठ्या साहित्यिकाकडून प्रभावी साहित्यनिर्मिती होते तेव्हा त्याच्यावर होणार्‍या संस्कारांचा, कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणाचा, संस्कार-शिकवण आणि मार्गदर्शनाचा मोठा वाटा असतो. गडकरींचं चरित्र अभ्यासतानाही हा अभ्यास अपरिहार्य ठरतो. तो काळच आपसुक निसर्गसानिध्य लाभण्याचा होता. गडकरींनीही तो अनुभवला. त्यांना पोहण्याची आवड होती. नदीत सूर मारायचा आणि मनमुराद पोहायचं हा लहानग्या रामचा छंद. हे वेड त्याला धोक्यात आणू शकतं अशी घरच्यांची आशंका असायची पण रामला पाण्याचं भय नव्हतं. असं अतिशय बुद्धिमान, कल्पक, व्य्रात्य पण तरीदेखील सगळ्यांचं लाडकं रामचं लहानपणीचं रूप होतं. अर्थात त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही.
वडिलांच्या मृत्यूनंतर काकांनी त्यांना शिक्षणासाठी गुजरातहून कर्जतला आणलं. तिथे त्यांना एक अत्यंत चांगले शिक्षक मिळाले ज्याचा उल्लेख ते कृतज्ञतापूर्वक करतात. कृष्णाजी विसाजी जोगळेकर हे त्यांचं नाव. मला जर काही यश प्राप्त झालं असेल तर त्यात जोगळेकर मास्तरांच्या आशीर्वादाचा मोठा वाटा आहे, असं गडकरींनी लिहून ठेवलं आहे. नंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयाबद्दलही त्यांच्या मनात अत्यंत प्रेम आणि आस्था होती. त्यांच्या अंत:करणाच्या गाभ्यात फर्ग्युसनच्या आठवणींचे ठसे खोलवर उमटल्याचं स्पष्ट पहायला मिळतं. पण इथेही खोडकर आणि बुद्धिमान विद्यार्थी हा त्यांचा नावलौकिक कायम होता.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘पानिपतचा फटका’ नावाची एक पोवाडासदृश रचना लिहिली. आपल्या सवंगड्यांच्या समवेत त्यांच्यातील विनोदी स्वभाव आणि कोटीबाजपणा आणखी बहरला. त्या तरुण वयात या वैशिष्ट्यांना उत्तेजन मिळालं असं म्हणता येईल. कोटीबाजपणाबद्दल ते तेव्हापासूनच नावाजले गेले. त्यांच्या कोट्या चकित करणार्‍या असत आणि विनोद अगदी उत्स्फूर्त असे. त्याच्याबद्दलच्या काही आख्यायिकाही आहेत. त्यातील एक गडकरींच्या हजरजबाबीपणाची प्रचिती देते. गोष्ट अशी घडली की, फुशारक्या मारण्याच्या, मोठेपणा दाखवण्याच्या तारुण्यसुलभ सवयीनुसार एकदा एक मित्र म्हणाला, ‘रात्रभर माझ्या डोक्याखाली विंचू होता. त्याने बरेचदा डोक्यावर नांग्या मारल्या पण तरीही मला काही झालं नाही.’ त्याचं हे अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य शांतपणे ऐकून घेतील ते गडकरी कसलेे! त्याचं वाक्य पुरं होताच ते म्हणाले, ‘बरोबर आहे, दगडाखाली विंचू सापडणार...!’ असा उत्स्फूर्तपणा आणि हजरजबाबीपणा  व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या साहित्यालाही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. त्यांच्या बोलण्यात आणि लिखाणात एक वेगळीच चमक आणि नाविन्य असायचं जे वेळोवेळी समोर येतं.
गडकरींना आपल्या बौद्धिक ऐश्‍वर्याची पुरेपुर जाणीव होती. याला अभ्यासाची जोड दिली पाहिजे याचंही भान त्यांना होतं. त्यामुळेच वाचन हे जवळजवळ व्यसन असल्यासारखी त्यांची परिस्थिती होती. पुढे त्यांच्या विडीच्या व्यसनाबद्दल अनेकांनी टिकाटिप्पणी केली पण वाचनाचं व्यसन  त्यापेक्षाही मोठं होतं. त्यांच्या वाचनात सर्व प्रकारची पुस्तकं असत. पुढे नाटकं लिहू लागले आणि ते किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी नाटकांवरील बहुसंख्य पुस्तकं वाचून काढली. नटांनी लिहिलेली पुस्तकं, नाटकांवरच्या टीका, परीक्षण आदींचा त्यात समावेश होता. त्यांचा आवडता नाटककार व्हिक्टर युगो आणि विनोदी लेखकांमध्ये आवडता मार्क ट्वेन. त्यांच्यावर मार्क ट्वेनचा मोठा प्रभाव असल्याचं लक्षात येतं. मराठी लेखनामध्ये ते तात्यासाहेब कोल्हटकरांना गुरू मानत असत तर काव्यामध्ये आपण केशवसुतांचे शिष्य असल्याचं सांगत असत. एका कवितेमध्येच त्यांनी स्वत:ला केशवसुतांचा ‘सच्चा चेला’ म्हणवून घेतलं आहे. केशवसूत वारल्यानंतर त्यांनी एक कविता लिहिली. यातील काही चरण खूप प्रसिद्ध आहेत. एका चरणात ते म्हणतात,
केशवसुत कसुचे गेले,
केशवसुत गातची बसले
हा जाणारा कवी नााचित म्हणूनच त्यांना ‘प्रेमाचे शाहीर’ अशीही उपाधी दिली गेली. विशेषत: ‘प्रेम आणि मरण’सारखी त्यांची कविता ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव   घडो मरणांचा मग पुढे’ असं म्हणते. त्यांचं प्रेम एकीकडे सात्विक आहे तर दुसरीकडे उत्कटही आहे. ही उत्कटता आणि सात्विकता एकाच ठिकाणी नांदवण्याचं कौशल्य त्यांच्या संपूर्ण कल्पनाशक्तीमध्ये आणि भाषेच्या आविष्कारामध्ये दिसतं. म्हणूनच गोविंदाग्रज कवी म्हणूनही तेवढेच प्रभावी राहिले. त्या काळातल्या  ‘कवी पंचक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच प्रमुख कवींमध्ये गोविंदाग्रजांचा उल्लेख केला जातो.
गडकर्‍यांचं विनोदी लेखन उपजत आणि शब्द चमत्कृतीपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. कोटीक्रम, हजरजबाबीपणा ही लेखनवैशिष्ट्यं ‘बाळकराम’ या टोपणनावाने  लिहिलेल्या विनोदी साहित्यातून दिसून येतात. ‘संपूर्ण बाळकराम’ हे त्यांचं विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे. यामधील निरनिराळ्या लेखांमधून समकालीन परिस्थितीचं दर्शन घडतंच शिवाय गडकर्‍यांच्या बुद्धिचापल्याचाही साक्षात्कार होतो. विनोद विसंगतीतील बारकावे हेरतो आणि पटकन शब्दांच्या चिमटीमध्ये पकडतो. हे  भाषावैशिष्ट्य गडकर्‍यांच्या विनोदी लेखनात दिसून येतं. मुख्य म्हणजे हे कथात्मक लेखन आहे. अशा पद्धतीने आजच्या काळातही आपण गडकरींच्या लेखनाचा प्रभाव अनुभवू शकतो. अल्प आयुष्य लाभलेल्या या प्रतिभावान कलाकाराला आपल्यातून निघून जाऊनही आता १०० वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

ही तर तुमच्या-माझ्यात अखंड गात राहणारा कवी आहे, असं गडकरी म्हणतात. मराठीमधील मोरोपंतही त्यांना खूप आवडायचे. आर्यारचना आणि त्यातील लयबद्धता याचं त्यांना आकर्षण होतं.  संतसाहित्याबद्दलही त्यांना विलक्षण प्रेम होतं. असं बर्‍याच प्रकारचं वाचन करणारा आणि अभिरुची जपणारा हा साहित्यिक कलंदर होता. मराठीप्रमाणेच त्यांचं इंग्रजीचंही चांगलं वाचन होतं आणि या भाषेवरही उत्तम प्रभुत्व होतं. म्हणूनच त्यांना ‘मराठीतील शेक्सपिअर’ म्हणतात. शेक्सपिअरची प्रतिभा बहुमुखी होती, त्यांच्या साहित्यातून विविध प्रकारच्या मानवी प्रवृत्तीचं दर्शन घडत असे. गडकरींच्या साहित्यात याचंच प्रतिबिंब बघायला मिळतं. संस्कृत नाटककार कालिदास यांचाही त्यांच्यावरील प्रभाव दडून रहात नाही. त्या काळी ‘शाकुंतल’बद्दल सगळ्यांनाच जशी आस्था होती, अभिमान होता तसा तो गडकर्‍यांनाही होता. ‘शाकुंतल’चं मोल पृथ्वीच्या किमतीनेही करता येणार नाही असं ते म्हणत असत.
तो संपूर्ण काळ राजकीय स्थित्यंतराचा होता. १८८५ मध्ये म्हणजेच गडकरी जन्मले त्या वर्षी कॉंग्रेसची स्थापना झाली. १९१९ मध्ये ते गेले. म्हणजेच लोकमान्यांच्या एक वर्ष आधी त्यांचं निधन झालं. या उण्यापुर्‍या ३४ वर्षांच्या आयुर्मानात इतक्या सगळ्यांचे प्रभाव घेत या माणसाने आपलं स्थान निर्माण केलं. त्यांचा उमेदीचा काळ टिळकयुगाने भारला होता. त्याचबरोबर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचादेखील त्यांच्यावर मोठा प्रभाव बघायला मिळतो. या माणसाने तीन प्रकारचं साहित्य लिहिलं. राम गणेश गडकरी या अधिकृत नावाने नाटकं लिहिली. त्यांच्या नावावर मोजून साडेपाच नाटकं आहेत. १९१३ मध्ये ‘प्रेमसंन्यास’ रंगभूमीवर आलं. पाठोपाठ ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ ही नाटकं आली. ‘वेड्यांचा बाजार’ हे अर्धं राहिलेलं प्रहसन आहे, ‘गर्वनिर्वाण’ हे देखील त्यांचं अर्ध राहिलेलं नाटक आहे. पुढे चिंतामणराव कोल्हटकरांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
गडकरी यांनी ‘सकाळचा अभ्यास’ नावाची एक एकांकिकाही लिहिली. आजदेखील ही बालसाहित्यातला आदर्श ठरावा अशी एकांकिका आहे. म्हणजेच त्यांनी ‘राजसंन्यास’सारखं संपूर्ण ऐतिहासिक नाटक लिहिलं, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ हे ऐतिहासिक वातावरण असणारं परंतु राजकीय नसणारं नाटकं लिहिलं. ‘एकच प्याला’ आणि ‘भावबंधन’चा विषय पूर्णपणे सामाजिक आहे. निरनिराळ्या काळामध्ये नाटक चालावं अशा प्रकारची कालातीतता ‘एकच प्याला’ला लाभली आहे. ‘भावबंधन’ कुठे तरी त्या काळाशी बांधलेलं आहे. या सगळ्या नाटकांमधून त्यांनी विविध प्रकारची पात्रं समोर आणली. केवळ साडेपाच नाटकांच्या माध्यमातून गडकरी यांनी मराठी रंगभूमीवर ठसा उमटवला. त्या नाटकांमध्ये काम करणार्‍या कलावंतांनादेखील गडकरी यांच्या नाटकात काम करणं हे अभिनेता म्हणून चिरंजीव राहण्यासारखं वाटत असे. ‘एकच प्याला’तील सुधाकराची भूमिका तर अनेक नामवंतानी गाजवली आहे. किर्लोस्कर कंपनीशी बांधील राहिल्यामुळे त्यांची ही सगळी नाटकं या कंपनीनेच रंगमंचावर आणली.
गडकर्‍यांची संगीत नाटकंही गाजली. ‘एकच प्याला’ हे असं नाटक आहे जे संगीत नाटकाच्या प्रयोगात अत्यंत चांगल्या पद्धतीने रंगू शकतं. पीडीएसारख्या संस्थेने संगीत वगळून या नाटकाचे प्रयोग करण्याचा प्रयत्नही करुन पाहिला आणि आश्‍चर्य म्हणजे संगीत वगळल्यामुळे त्यातील आशय आणि परिणामकारकतेला कुठेही बाधा आली नाही. हीदेखील एक विलक्षण बाब म्हणायला हवी. संगीत रंगभूमीमध्ये संगीत गाळून टाकलं तर काहीच उरत नाही, नाट्याचा प्रभाव कमी होतो असं म्हटलं जातं. पण गडकर्‍यांचं गद्यही तेवढंच प्रभावी आहे. म्हणूनच पदं असली काय आणि नसली काय, फारसा फरक पडलेला दिसत नाही. नाटकाची ताकद कथानकातून, गद्यातून आणि त्यातील भाषणातून व्यक्त होते. कारण गडकर्‍यांचं नाटक हे भाषाप्रभू नाटक आहे. त्यांच्या सगळ्या नाटकांमध्ये प्रदीर्घ स्वगतं आहेत. ‘एकच प्याला’, ‘राजसंन्यास’ मध्ये आपण ती पाहतो. ही स्वगतं अतिशय ताकदीची असून त्यातून त्या त्या पात्रांची व्यक्तिमत्त्वं त्यांनी उभी केलेली आहेत. म्हणजेच इथेही शेक्सपिअरचं स्वगतांचं वैशिष्ट्य दिसून येतं. मुख्य म्हणजे ते कंटाळवाणं न होता भाषेच्या चमत्कृतीमुळे लखलखत राहतं. म्हणूनच ही लखलखणारी भाषा आहे. कान दिपवणारी भाषा आहे.
कवी म्हणूनही ते तेवढेच प्रसिद्धी पावले. त्या काळच्या टोपणनाव घेण्याच्या पद्धतीप्रमाणे गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या. त्यांचा एकच काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. ‘वाग्वैजयंती’ हे त्याचं नाव. त्यांच्या कवितांवर केशवसुतांचा मोठा प्रभाव दिसून येतोे. केशवसुतांची ‘दसरा’ नावाची कविता होती, गडकर्‍यांनीही याच नावाची एक कविता लिहिली. केशवसुतांच्या ‘तुतारी’चा अनुकार त्यांच्या काव्यातून झालेला दिसतो. सामाजिक जाणिवा, राष्ट्रप्रेम या सगळ्या बाबी त्यांच्या काव्यात आहेतच पण त्यापेक्षाही त्यांनी प्रेमाची आणि प्रणयाची वेगळी रूपं रचलेली दिसतात, जी वेगळी आहेत. कद

वाक्प्रचार,कुसुमाग्रज

||||| वाक्प्रचार |||||
[ 1 ] अवीट गोडी येणे -                                                आनंदाचे दिवस येणे
[ 2 ]अमर होणे-कायमची कीर्ती प्राप्त करणे
[ 3 ] अमरपट्टा घेऊन येणे -मरणाची भीती नाही अशी शक्ती मिळविणे
[ 4 ] अक्कल विकत घेणे -अनुभवातून  सोसून शहाणपण शिकणे
[ 5 ] अक्कल पुढे धावणे - बुद्धीचा योग्य तऱ्हेने उपयोग न करणे
[ 6 ] अकरावा रूद्र असणे -अतिशय तापट असणे
[ 7 ] अक्कलेचे तारे तोडणे -अविचाराने बडबड करणे
[ 8 ]अकलेचा कांदा असणे - बेअकली असणे
[ 9 ] अक्कल मिळकत खाणे -काहीही न खाणे
[ 10 ] अग्निदिव्य करणे -कठीण कसोटीतून पार पाडणे
[ 11 ] अखेरी मारणे- शेवटचा डाव जिंकणे
[ 12 ] अघळपघळ भाषण करणे -पुष्कळसे आणि मन मोकळे करुन बोलणे
[ 13 ] अग्नि प्रवेश करणे -सती जाणे
[ 14 ] अरत्र ना परत्र -इहलोक ना परलोक
[ 15 ] अनुग्रह करणे -कृपा करणे                            

_____________________________


*कुसुमाग्रज* : (२७ फेब्रुवारी १९१२–  ). एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. *पूर्ण नाव : -विष्णू वामन शिरवाडकर*. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नासिक येथे शिक्षण. बी.ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नासिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नासिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता.

*कुसुमाग्रजकुसुमाग्रज*

जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा  हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. कवीच्या क्रांतिप्रवण मनोवृत्तीचा, विजिगीषू मानवतेचा व ध्येयवादी  प्रीतीचा भव्योदात्त कल्पनाचित्रांनी व संपन्न शब्दकळेने केलेला स्फूर्तिदायक आविष्कार त्यातील विविध कवितांतून आढळतो. ‘अग्निसंप्रदायी काव्य’ या नावाने विशाखेची एक परंपराच नंतर मराठी काव्यात निर्माण झाली. त्यांची कविता संघर्षातून अवतरते. विशाखानंतरची त्यांची कविता अधिक अंतर्मुख होऊन सामाजिक संघर्षाबरोबरच मानसिक व तात्त्विक संघर्षाकडे वळली. वाढत्या वयाबरोबर कवीच्या अंतर्जीवनाशी सतत एकरूप होऊन वाढत जाणारी कविता दुर्मिळ असते. कुसुमाग्रजांचे काव्य या अर्थाने मराठीच अनन्यसाधारण आहे. केशवसुतांच्या क्रांतिकारक काव्याशी त्याचे नाते आहे. आधुनिक काव्य हा कुसुमाग्रजांच्या चिंतनाचाही विषय असून त्यांनी काही मार्मिक काव्यसमीक्षात्मक निबंधही लिहिले आहेत.

शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत. प्रकृतीने गंभीर व रचनाशिल्पाच्या दृष्टीने रेखीव व निर्दोष असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या अंतःकलहाचे सखोल दर्शन घडते. मार्मिक नाट्यदृष्टी, काव्यात्म भाषाशैली व स्वतंत्र आशयानुकूल रचनातंत्र या गुणामुळे प्रयोगदृष्टीनेही त्यांची नाटके यशस्वी झाली आहेत. १९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट  ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.

वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथासंग्रहांत फुलवाली  (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८) यांचा अंतर्भाव होतो. काव्यात्मता व विचारप्रेरकता हे त्यांच्या कथासाहित्याचे विशेष होत. कालिदासाच्या मेघदूताचे मराठी रूपांतर (१९५६), समिधा (१९४७) हा मुक्तकाव्यांचा संग्रह, आहे आणि नाही (१९५७) हा लघुनिबंधसंग्रह तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो. अन्य मराठी कवींचे काही काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केले आहेत.

१९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.