Sunday 22 September 2019

अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात

🅾ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे. अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत.

🅾२८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली. सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले. रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले. या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

🅾अत्याधुनिक पद्धतीने गाणे रेकॉर्डिग करून त्याचे चित्रिकरण करण्यासाठी निधीची समस्या होती. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी युनिसेफशी संपर्क साधला. युनिसेफसह मुंबई येथील माहितीपटाचे निर्माते प्रीतेश पटेल यांनी सहकार्य केले. पुणे जिल्हय़ाच्या भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत अल्बमचे २९ ते ३१ जुलै दरम्यान चित्रिकरण करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक विद्यार्थी व पालकांनाच कलाकार म्हणून संधी मिळाली. तिशीच्या आतील युवांच्या चिकाटीतून ‘खून जिस्म से निकले, तो ये जहाँन चले’ हा संगीत अल्बम तयार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हे गाणे  ट्विट केले.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...