Sunday 22 September 2019

चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा 11 ऑक्टोबर 2018 रोजी केली.

📍चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र

📍हे केंद्र महाराष्ट्रात स्थापन केले जाईल.

या केंद्राने ड्रोन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे तीन प्रकल्प सुरूवातीला हाती घेतले आहेत.

हे केंद्र केंद्रशासनाच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञानासाठी धोरण आराखडे व तत्वे तयार करण्याचे काम करेल.

या कामात उद्योग, अॅकॅडमीक्स, स्टार्ट अप्स व आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यामधील तज्ज्ञांकडून साहाय्य घेतले जाईल.

WEF ने सुरूवातीला महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांशी नवीन तंत्रज्ञानात्मक पुढाकारासाठी भागीदारी केली आहे. यापुढे अजून इतर राज्यांशी भागीदारीसाठी WEF प्रयत्न करेल.

हा प्रकल्प संपूर्ण भारतभर व जगभर लागू होईल. WEF च्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून भारतातील हे केंद्र सॅन फ्रान्सिको, टोकयो, बीजींग या केंद्राच्या समवेत कार्यरत राहील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...