Sunday 22 September 2019

न्या. ताहिलरामानी यांचा राजीनामा मंजूर

◾️मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती सरकारी अधिसूचनेत देण्यात आली आहे.

◾️६ सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात केलेली बदली रद्द करण्यास नकार दिला होता.

◾️ त्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला.

◾️मद्रास उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता व्ही. कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◾️मद्रास उच्च न्यायालयातून ताहिलरामानी यांच्या केलेल्या बदलीमुळे चेन्नई व महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वकिलांकडून निदर्शने करण्यात आली होती.

◾️बदलीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ताहिलरामानी यांनी सहा सप्टेंबरला राजीनामा दिला होता.

◾️ त्यांनी हा राजीनामा  राष्ट्रपती कोविंद यांना पाठवला व त्याची प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठवली होती.

◾️गोगोई यांनी ताहिलरामानी यांच्या बदलीची शिफारस केली होती.

◾️ताहिलरामानी यांना गेल्या वर्षी ८ ऑगस्टला बढती देऊ न मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमण्यात आले होते.

◾️ २६ जून २००१ रोजी ताहिलरामानी यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले होते.

◾️त्या २ ऑक्टोबर २०२० रोजी निवृत्त होणार होत्या.

◾️त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी  न्या. कुरशी यांच्या नावाची शिफारस

◾️त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. अकील कुरेशी यांना बढती द्यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.

◾️यापूर्वी न्या. कुरेशी यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामध्ये न्यायवृंदाने बदल केला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...