Tuesday 8 October 2019

विष्णू नंदन: सर्वात मोठ्या आर्क्टिक मोहिमेमध्ये सहभागी झालेला भारतीय

🌺केरळचे 32 वर्षीय ध्रुवीय संशोधक विष्णू नंदन हे ‘मल्टीडिसीप्लिनरी ड्रिफ्टिंग अब्जर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट’ (MOSAiC) या अभ्यास मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले एकमेव भारतीय ठरले आहेत.

🌺पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणात होणार्‍या बदलांविषयी अभ्यास करण्यासाठी यंदा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

⬛️ ठळक बाबी...‼️

🌺‘वैश्विक तापमानवाढ’चे केंद्र म्हणून आर्क्टिक प्रदेशाचे बारीक निरीक्षण करणे आणि जागतिक हवामान बदलांविषयी अधिक चांगले आकलन व्हावे त्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मूलभूत गोष्टींबाबत अंतर्दृष्टी प्राप्त करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.

🌺जगातल्या 300 शास्त्रज्ञांची चमू हा अभ्यास करणार आहे.हवामान बदलांचा होणारा परिणाम आणि जागतिक हवामानाविषयी करण्यात येणारा अंदाज सुधारण्यात यामुळे मदत होऊ शकणार.

🌺जर्मनीचा ‘अल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूट’ नामक शास्त्रज्ञांच्या संघाच्या नेतृत्वात ही मोहीम संपूर्ण वर्षभर चालवली जाणार आहे. हिवाळ्यातल्या परिस्थितीमुळे पूर्वी कमी कालावधीतच अभ्यास केला गेला आहे.

🌺यंदा हिवाळ्यापूर्वीच समुद्रातल्या एका मोठ्या बर्फाच्या थराखाली संशोधक स्वतःला बंदिस्त करून घेणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धाव...