Tuesday 8 October 2019

महिलांच्या वनडे मानांकनात भारत दुसऱया स्थानी

- आयसीसीच्या महिलांच्या ताज्या वनडे मानांकनात भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान अधिक मजबूत करताना नजीकच्या इंग्लंड संघावर तीन गुणांची आघाडी मिळविली आहे.

- मानांकन यादी खालीलप्रमाणे आहे
१)  ऑस्ट्रेलिया
२)  भारत   (125)गुण)
३)  इंग्लंड  (122 गुण) 

- मिथाली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने अलिकडच्या कालावधीत इंग्लंड संघावर तीन गुणांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी उभय संघातील फरक केवळ एका गुणांचा होता.

-  आयसीसीच्या टी-20 महिलांच्या मानांकनात भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे.

- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना वनडे आणि टी-20 या प्रकारात आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले आहे. गेल्यावर्षी विंडीजमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबाई        1646 नाशिक            स...