Tuesday 8 October 2019

तीन शास्त्रज्ञांना वैद्यशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👤वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्र (मेडीसिन) या क्षेत्रात जगातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. फिजिओलॉजी या वैध्यकशास्त्रातील शोधासाठी विल्यम जी केलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या तिघांनाही कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

यावर्षीच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. आज वैद्यकशास्त्रातील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर उद्या भौतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबर पर्यंत अन्य पाच क्षेत्रातील विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. स्वीडिश अकादमी २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांसाठी साहित्य नोबेल पुरस्कारांची घोषणा करणार आहे. गेल्यावर्षी लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्याने २०१८ च्या साहित्य नोबेल पुरस्काराची घोषणा करण्याचे अकादमीने टाळले होते.

🚔नोबेल पुरस्कारांची घोषणा अशी होणार 👇

📌सोमवारी, ७ ऑक्टोबर - वैद्यकशास्त्र
📌मंगळवार, ८ ऑक्टोबर - भौतिक शास्त्र
📌बुधवार, ९ ऑक्टोबर - रसायनशास्त्र
📌गुरुवार, १० ऑक्टोबर - साहित्य
📌शुक्रवार, ११ ऑक्टोबर - शांतता
📌सोमवार, १४ ऑक्टोबर - अर्थशास्त्र

🌻विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र व साडे चार कोटी रुपये रोख

नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात. तसेच २३ कॅरेट सोन्याचा २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक दिले जाते. या पदकावर त्यांचा जन्म आणि मृत्यू अशी तारीख असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजुला युनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.

🌻वैध्यकशास्त्रात आतापर्यंत १२ महिलांसह २१६ जणांना पुरस्कार

👤१९०१ ते २०१८ पर्यंत वैद्यकशास्त्रात आतापर्यंत १०९ पुरस्कार देण्यात आले आहे. एकूण २१६ विजेत्यांमध्ये १२ महिलांचा समावेश आहे. यात २००९ मध्ये एकाचवेळी दोन महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. इंसुलिनचा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक जी. बँटिंग यांनी १९२३ साली अवघ्य ३२ व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला होता. वैद्यशास्त्रात हा पुरस्कार मिळणारे ते एकमेव तरुण शास्त्रज्ञ आहेत. तर पेटोन राउस (वय ८७) सर्वात जास्त वयस्कर नोबेल पुरस्कार मिळवणारे ठरले आहेत. त्यांना ट्यूमर इंड्यूसिंग व्हायरसच्या शोधासाठी १९६६ साली हा पुरस्कार मिळाला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...