Tuesday 8 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
   1) निलिमा    2) नीलिमा   
   3) निलीमा    4) नीलीमा

उत्तर :- 2

2) मराठीत एकूण स्वर किती आहेत ?
   1) आठ    2) दहा     
  3) बारा      4) चौदा

उत्तर :- 3

3) ‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो’ यास काय म्हणतात ?

   1) बलाघात    2) सीमासंधी   
  3) सुरवली    4) व्यंजनव्दित्त
उत्तर :- 2

4) पुढीलपैकी कोणत्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात.

   अ) भाववाचक नामे  ब) विशेषनामे   
   क) सामान्यनामे    ड) पदार्थवाचक नामे

   1) फक्त अ    2) फक्त ब व क    3) वरील सर्व    4) फक्त अ व ब
उत्तर :- 2

5) ‘कोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात ?

   1) प्रश्नार्थक व अनिश्चित    2) दर्शक व संबंधी
   3) पुरुषवाचक व अनिश्चित  4) दर्शक व प्रश्नार्थक

उत्तर :- 1

6) ‘उपाहार’ या शब्दाचा अचूक अर्थ शोधून लिहा.
   1) भेट      2) अधिक आहार     
   3) हॉटेल    4) फराळ

उत्तर :- 4

7)’आग्रही’ याच्या विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

   1) विग्रही    2) दुराग्रही   
   3) ग्रहविरहीत    4) अनाग्रही

उत्तर :- 4

8) ‘धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही’ या अर्थाची म्हण –

   1) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी      2) दाम करी काम
   3) मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधायची      4) गर्जेल तो पडेल काय ?

   उत्तर :- 3

9) इरेला पेटणे : या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा.

   1) चूल पेटविणे    2) चुरस वाटणे   
   3) जोरात धावणे    4) विस्तव पेटविणे

उत्तर :- 2

10) दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा : पाण्यातील कचरा.

   1) पाणिवळ    2) पातवडी   
   3) पाणसळ    4) पाणलोट

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...