Tuesday 7 January 2020

नीति आयोगाने एसडीजी इंडिया ईडेक्स अर्थात शाश्वत विकास लक्ष्य आणि डॅशबोर्डचं केले प्रकाशन

📌नीति आयोगाने आज शाश्वत विकास लक्ष्य अर्थात एसडीजी इंडिया इंडेक्स प्रकाशित केले. यामध्ये 2030 चे शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली प्रगती दर्शवण्यात आली आहे.

📌केंद्रीय संख्याशास्त्र आणि प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालय, भारतातील संयुक्त राष्ट्र कार्यालये आणि जागतिक हरित विकास संस्था यांनी एसडीजी इंडिया इंडेक्स संयुक्तरित्या विकसित केला आहे.

📌 नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संयुक्त राष्ट्र आणि संख्याशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

📌2030 चे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.

📌शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी 2020 मध्ये संपूर्ण जग कृतीशील दशकात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच आत्ताच कृती करण्याची वेळ आहे, असंही ते म्हणाले.

📌शाश्वत विकास लक्ष्याबाबतच्या विकासाचे मोजमाप करणारा भारत हा जगातील सरकारच्या नेतृत्वाखालील पहिलाच देश आहे

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...