Tuesday 7 January 2020

जी. बबीता रायुडू: SEBI याचे नवे कार्यकारी संचालक..

बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणारी भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) यांनी जी. बबिता रायुडू ह्यांची कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे. 1 जानेवारी 2020 रोजी रायुडू ह्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. रायुडू व्यतिरिक्त SEBIमध्ये आणखी आठ कार्यकारी संचालक कार्यरत आहेत.

रायुडू नव्या पदभारासह कायदेशीर व्यवहार विभाग, अंमलबजावणी विभाग आणि विशेष अंमलबजावणी कक्ष सांभाळणार आहेत.

SEBI विषयी:-

भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) हे भारतामध्ये समभाग बाजारपेठेमधील सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने यांच्या संदर्भात होणार्‍या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारे विभाग आहे.

1988 साली या संस्थेची स्थापना झाली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. मुंबईत त्या मंडळाचे मुख्यालय आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...