Tuesday 7 January 2020

सहा चेंडूत सहा षटकार

🔰 एका षटकात सलग 6 षटकार (सिक्स) मारण्याची विक्रमी कामगिरी, न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी टी -20 क्रिकेटमध्ये केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

🔰 असे ठोकले षटकार : कार्टरने नाईट्स संघाचा फिरकी गोलंदाज अँटोन डेवसिचच्या एका षटकात सलग 6 षटकार ठोकले.

🔰 6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज :

▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)

🔰 दरम्यान, कार्टरने डोमॅस्टिक टी -20 स्पर्धेत कँटरबरी संघाकडून खेळत ही कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...