Tuesday 7 January 2020

हॉकीपटू सुनीता लाक्राची निवृत्ती

- गुडघ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्द संपुष्टात

- भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.

- भारताच्या महिला हॉकी संघाने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्या संघात सुनीताचा समावेश होता. २८ वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.

- सुनीताने १३९ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सुनीताचे स्वप्न होते.

-  ‘‘आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होत आहे. २०१६मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्या वेळेस तीन दशकांनंतर भारताच्या महिला हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मान मिळाला होता. या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहणार आहेत.

- ‘हॉकी इंडिया’चीही मी आभारी आहे. दुखापतींवर चांगले उपचार मिळण्यापासून प्रत्येक वेळी हॉकी इंडियाकडून चांगले सहकार्य लाभले,’’ असे सुनीताने म्हटले.

- आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय हा माझ्यासाठी भावुक क्षण आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण होता. टोक्यो ऑलिम्पिकसाठीदेखील आपण तयारी करत होतो.

- मात्र गुडघा दुखापतीवर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहोत. आपले संघसहकारी, हॉकी इंडिया आणि आपले प्रशिक्षक शोर्ड मरीन यांचे आपण विशेष आभार मानत आहोत. माझ्या कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाशिवाय हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास आपण करू शकलो नसतो. - सुनीता लाक्रा

▪️शेतकरी वडिलांकडून नेहमीच प्रोत्साहन

- सुनीता लाक्राचा जन्म ओदिशामधील राजगंजपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी सुनीताला सहाव्याच वर्षी रॉरकेला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) हॉकी प्रशिक्षणासाठी पाठवले.

- वास्तविक लाक्रा यांच्या घरात सर्व मुले व मुली फुटबॉल खेळायचे. मात्र तरीदेखील हा खेळ धोकादायक आहे असे मानणाऱ्या सुनीताच्या वडिलांनी आपल्या मुलीला हॉकीसाठी प्रोत्साहन दिले.

- सुनीताचे तिच्या यशस्वी कारकीर्दीसाठी अभिनंदन. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममधील आपल्या सोबतच्या आठवणी बऱ्याच आहेत. दशकाहून अधिक काळ आपण एकत्र खेळलो आहोत. लवकरच सुनीता तू बरी हो.

- राणी रामपाल, भारतीय हॉकी कर्णधार

▪️एक नजर कामगिरीवर

- * १३९ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

- * २०१४मध्ये इन्चॉनमधील एशियाडमध्ये कांस्यपदक

- * २०१८ आशिया चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व- स्पर्धेत भारताला दुसरे स्थान

- * २०१८मध्ये जकार्तामधील एशियाडमध्ये रौप्यपदक
-------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...