Tuesday 7 January 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या हस्ते 28 व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2020 चे उद्घाटन

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल 'निशंक' यांच्या हस्ते 28 व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2020 चे उद्घाटन आज प्रगती मैदान येथे झाले. प्रथितयश गांधीवादी विचारवंत प्रा. गिरीश्वर मिश्रा, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद प्रसाद शर्मा, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव मदन मोहन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना 'निशंक' यांनी या पुस्तक मेळाव्याला पुस्तकांच्या महाकुंभची उपमा दिली. पुस्तक सागराच्या मध्यभागी आपण उभे असून हा मेळावा मनुष्यत्वाला शक्ती देणाऱ्या विचारांनी भारून गेलेला आहे. हा मेळावा म्हणजे असे स्थान आहे जेथे लोक एकमेकांना भेटतात आणि नवीन आचारविचार, कल्पना यांची देवाणघेवाण करतात. तसेच युवा पिढीला नवीन विचारांच्या समीप आणतात, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

यंदाची संकल्पना 'गांधी: लेखकांचे लेखक' याबाबत सांगताना ते म्हणाले की, आपण गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असताना जाणवत आहे की, आपल्याला त्यांची खूप गरज आहे; जग आतंकवादासह अन्‍य समस्यांना सामोरे जात आहे. आज जग, देश, समाज आणि प्रत्येक व्यक्तीसाठी गांधी आवश्यक आहेत ते त्यांच्या शांतता व अहिंसेबाबतच्या दूरदृष्टी व तत्वज्ञानामुळे. 

याप्रसंगी केंद्रीय मंत्री 'निशंक' यांनी प्रकाशकांना पुस्तकांचा प्रचार प्रसार करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा आशिया खंडातील निर्विवादित भव्य पुस्तक मेळावा असल्याबद्दल कौतुक करताना 'निशंक' यांनी लवकरच हा जगातील सर्वात भव्य पुस्तक मेळावा असेल, अशी आशा व्यक्त केली.   

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...