07 January 2020

बेन स्टोक्सचा क्षेत्ररक्षणात विक्रम

◾️एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

◾️दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.

◾️इंग्लंडच्या १०१९ सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया २३ वेळा घडली आहे.

◾️जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा ११वा खेळाडू आहे.

◾️अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...