Thursday 10 December 2020

फोर्ब्स पावर लिस्ट’2020



● फोर्ब्सने 2020 (Forbes Power Women ) वर्षातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे. 


या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलॅंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ज्यांनी कडक नियमावली करत आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवलं.


● 17 व्या वार्षिक ‘फोर्ब्स पावर लिस्ट’ मध्ये 30 देशांमधील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सनं म्हटलं आहे की, यामध्ये दहा देशांच्या प्रमुख, 38 सीईओ आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. भलेही त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील मात्र 2020 सालात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे.


● निर्मला सीतारमण या यादीत 41 व्या स्थानी आहेत. नडार मल्होत्रा 55 व्या तर किरण मजूमदार शॉ 68 व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत 98व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...