Thursday 10 December 2020

सह्याद्री पर्वत


--------------------------------

• सह्याद्रीची निर्मिति प्रस्तरभंगामुळे झाली आहे


• सह्याद्री हा अवशिष्ट पर्वत आहे


• सह्याद्री पर्वतास पश्चिमघाट असेही म्हणतात


• सह्याद्री पर्वत कोकण किनार पट्टीस समांतर आहे


• सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेस सातमाळा डोंगरा पासून( तापी नदी) ते दक्षिणेस *कन्याकुमारी* पर्यन्त आहे


• सह्याद्री पर्वताची लांबी १६०० किमी असून, महाराष्ट्रात त्याची ४४० किमी आहे


• सह्याद्री पर्वताने (पश्चिम घाट) दक्खननच्या पठराची पश्चिम सीमा निश्चित केली आहे


• सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्या पासून सरासरी ३० ते ६० किमी अंतरावर आहे


• सह्याद्री पर्वताची उंची ९१५ ते १२२० मीटर आहे


• सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे कमी होत जाते तर उत्तरेकड़े वाढते


• सह्याद्री पर्वताची रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस कमी आहे


• सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे 

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...