Thursday 10 December 2020

सवाऱ्या चंद्रावरच्या


◾️गल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. 


◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.


◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका. 


◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.


◾️ तयानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं. 


◾️तया काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.


◾️ तयानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.


    💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢


◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.


◾️ तयापैकी १६ यशस्वी झाल्या. 


◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.


  💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢


◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या. 


◾️यातील १५ यशस्वी झाल्या. 


◾️लना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले. 


◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.


      💢 जपान : १९९० पासून 💢


◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली. 


◾️चद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला. 


◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.


◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.


        💢 चीन : २००७ पासून 💢


◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. 


◾️चग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते. 


◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.


💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢


◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता. 


◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली. 


◾️शरीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले. 


◾️चद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.


◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...