Saturday 26 March 2022

वाक्य

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.

मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषत: नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).

हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) वाक्यातील एकेक पद हे एकेका शब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेऊन) वाक्य बनते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...