Friday 25 March 2022

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही ! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही.

🟤रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने रेल्वे क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी राज्यसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात दिली.

🟤रेल्वे क्षेत्रात २००९-१४ या काळात २ लाख ४२ हजार ७०९ रोजगार देण्यात आले. त्या तुलनेत २०१४ पासून आत्तापर्यंत ३ लाख ४४ हजार ६४६ नोकऱ्या दिल्या गेल्या. १ लाख ४० हजार ७१३ पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत, अशी माहिती देत रेल्वे मंत्रालयाने भरती थांबवल्याचा विरोधकांचा आरोप वैष्णव यांनी फेटाळला.

🟤काँग्रेसच्या काळात रेल्वे क्षेत्रातील विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले पण, त्यामध्ये दूरदृष्टी नव्हती. कुठे स्टेशन उभे करायचे आहे, कुठे रेल्वे सुरू करायची आहे, ही माहिती म्हणजे व्हिजन नव्हे. रेल्वे क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण होत असून विशिष्ट ध्येय ठरवून कामे पूर्ण केली जात आहेत.

🟤२०१४-१९ मध्ये दरवर्षी ३,४४० किमी विद्युतीकरण केले गेले, ५० हजार कमीचे विद्युतीकरण झाले आहे. आगामी ३०-४० वर्षांचा आढावा घेतला जाणार आहे, असे वैष्णव म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...