Sunday 3 April 2022

लक्षात ठेवा

कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.

सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.
म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.

तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.

पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.

चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.

पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.

▪️नदया

भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.

सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...