Sunday 3 April 2022

डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला : जागतिक व्यापार संघटना (WTO) याची पहिली महिला प्रमुख.

✅✅ डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला : जागतिक व्यापार संघटना (WTO) याची पहिली महिला प्रमुख. ✅✅
#Appointment #VyaktiVishesh

🔰 जागतिक व्यापार संघटनेचे नवे महानिदेशक म्हणून नायजेरियाच्या अर्थशास्त्री डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला यांची निवड झाली आहे.

🔰 त्या WTO संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला तसेच आफ्रिका खंडाची पहिली व्यक्ती ठरल्या आहेत.

🔰 डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला ऑगस्ट 2020 मध्ये पदभार सोडणाऱ्या रॉबर्टो अझेवेदो यांच्याकडून संघटनेचे नेतृत्व स्वीकारणार.

🌐 जागतिक व्यापार संघटना (WTO) विषयी :-
#WTO

🔰 ही एक आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 

🏢 मुख्यालय :- जिनेव्हा (स्वित्झर्लंड)

♻️ सदस्य :-  164 देश

🔰 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून

🔰 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.

🔰 WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच

🔰 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.

No comments:

Post a Comment

Latest post

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ...