Wednesday 27 April 2022

शर्विका म्हात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

❇ *​शर्विका म्हात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद*

- भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली.

- अलिबागच्वया शर्विका म्हात्रेची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील लोणेरे येथे राहणारी शर्विका ही दीड वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने अतिशय दुर्गम किल्ले पायी चढून सर केले आहेत.

- जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विकाला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले.

- गड किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. मात्र पायी गड किल्ले सर करताना अनेकांची दमछाक होत असते. मात्र शर्विका ही दीड वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करीत आहे. शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे आणि आई अमृता म्हात्रे यांना गड किल्ल्यावर जाण्याची हौस आहे.

-  मावळा प्रतिष्ठानमध्ये दोघेही सहभागी होऊन गड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. शर्विकालाही लहानपणापासूनच गड किल्ल्याचे आकर्षण असून सुट्टीत ती समुद्र वा इतर ठिकाणी न जाता गड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट करीत असते, असे तिची आई अमृता म्हात्रे यांनी सांगितले. गड, किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेतही शर्विका स्वतहून भाग घेत असते.

- शर्विकाने आतापर्यंत ११ किल्ले हे पायी चढून सर केले आहेत. २६ जानेवारी रोजी प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण किल्ला पायी चढून झेंडा फडकवला होता. शर्विकाला सर्व किल्ल्याची नावे पाठ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची गारदही पाठ आहे. भविष्यात तिला चांगली गिर्यारोहक बनविण्याचा मानस असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...